Advertisements
Advertisements
Question
आकृती मध्ये वृत्तचिती आकाराच्या चपट्या गोळ्यांचे 10 सेमी लांबीचे एक वेष्टन आहे. एका गोळीची त्रिज्या 7 मिमी आणि उंची 5 मिमी असल्यास अशा किती गोळ्या त्या वेष्टनात मावतील?
Solution
दिलेले: वृत्तचिती आकाराच्या गोळीसाठी,
त्रिज्या (r) = 7 मिमी, उंची (h) = 5 मिमी,
वृत्तचिती आकाराच्या वेष्टनासाठी,
व्यास (D) = 14 मिमी, उंची (H) = 10 सेमी,
शोधा: वेष्टनात मावणाऱ्या गोळ्यांची संख्या
उकल:
वेष्टनाची त्रिज्या (R) = `(व्यास)/2`
= `14/2 = 7` मिमी
वेष्टनाची उंची (H) = 10 सेमी
= 10 × 10 मिमी
= 100 मिमी
वृत्तचिती आकाराच्या वेष्टनाचे घनफळ = `piR^2H`
= `pi(7)^2 xx 100`
= 4900π mm3
वृत्तचिती आकाराच्या गोळ्यांचे घनफळ = πr2h
= `pi(7)^2 xx 5`
= 245 π mm3
वेष्टनात मावणाऱ्या गोळ्या = `"वृत्तचिती आकाराच्या वेष्टनाचे घनफळ"/"वृत्तचिती आकाराच्या गोळ्यांचे घनफळ"`
= `(4900pi)/(245pi) = 20`
∴ त्या वेष्टनात एकूण 20 गोळ्या मावतील.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील दिलेल्या आकृतीमधील भांड्यांची मापे पाहा. त्यावरून वृत्तचिती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल हे काढा.
पाण्याचा शंक्वाकृती जग
वृत्तचिती आकाराचे भांडे
आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचिती आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे व त्यामध्ये एक धातूची 2 सेमी व्यासाची गोळी बुडालेली आहे. तर पाण्याचे घनफळ काढा.
एक शंकू वितळवून त्याच्या तळाच्या त्रिज्येएवढ्याच त्रिज्येची वृत्तचिती तयार केली. जर वृत्तचितीची उंची 5 सेमी असेल तर शंकूची उंची किती?