English

आकृतीमध्ये, जीवा LM ≅ जीवा LN आणि ∠L = 35°, तर i. m(कंस MN) = किती? ii. m(कंस LN) = किती? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

आकृतीमध्ये, जीवा LM ≅ जीवा LN आणि ∠L = 35°, तर

i. m(कंस MN) = किती?

ii. m(कंस LN) = किती? 

Sum

Solution

 

i. ∠L = `1/2`(कंस MN) ...........[अंतर्लिखित कोनाचे प्रमेय]

∴ 35° = `1/2`m(कंस MN)

∴ 2 × 35° = m(कंस MN) = 70°

ii. ΔLMN मध्ये, जीवा LM ≅ जीवा LN 

∴ ∠M = ∠N ............[समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय]

∴ ∠L + ∠M + ∠N = 180° ..............…[त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.]

∴ 35° + ∠M + ∠M = 180°

∴ 2∠M = 180° - 35° = 145°

∴ ∠M = `145^circ/2`

आता, m(कंस LN) = 2 × ∠M …...........[अंतर्लिखित कोनाचे प्रमेय]

= `2 xx 145^circ/2 = 145^circ`

shaalaa.com
अंतर्लिखित कोनाचे प्रमेय
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: वर्तुळ - Q ६

APPEARS IN

RELATED QUESTIONS

आकृती मध्ये, `square`PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ ≅ बाजू RQ. ∠PSR = 110°, तर 

(1) ∠PQR = किती?

(2) m(कंस PQR) = किती?

(3) m(कंस QR) = किती?

(4) ∠PRQ = किती?


केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या कंस ACB मध्ये ∠ACB अंतर्लिखित केला आहे. जर m∠ACB = 65° तर m(कंस ACB) = किती? 


दिलेल्या आकृतीतील, जीवा EF || जीवा GH तर सिद्ध करा, जीवा EG ≅ जीवा FH. पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरा आणि सिद्धता लिहा.

सिद्धता:

रेख GF काढला.

∠EFG = ∠FGH .........`square` (i)

∠EFG = `square` ........… [अंतर्लिखित कोनाचे प्रमेय] (ii)

∠FGH = `square` .......… [अंतर्लिखित कोनाचे प्रमेय] (iii)

∴ m(कंस EG) = `square` ......[(i), (ii) व (iii) वरून]

जीवा EG ≅ जीवा FH ..............[एकरूप कंसांच्या संगत जीवा]


सिद्ध करा: एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन हे एकरूप असतात.

 

पक्ष : ∠PQR व ∠PSR एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन आहेत, कंस PTR हा त्या कोनांनी अंतर्खंडित केलेला कंस आहे.

साध्य : ∠PQR ≅ ∠PSR

सिद्धता: 

m∠PQR = `1/2 xx` [m(कंस PTR)] .......(i) `square`

m∠`square = 1/2 xx` [mकंस PTR] ........(ii) `square`

m∠`square` = m∠PSR ..................[(i) व (ii) वरून]

∴ ∠PQR ≅ ∠PSR


खालील प्रमेय सिद्ध करा:

एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात.


आकृतीमध्ये, `square`PQRS हा चक्रीय चौकोन आहे. बाजू PQ ≅ बाजू RQ, ∠PSR = 110°, तर m(कंस PQR) = किती?

 


खालील आकृतीमध्ये, P केंद्र असलेले वर्तुळ ΔABC मध्ये अंतर्लिखित असून बाजू AB, बाजू BC व बाजू AC ला अनुक्रमे L, M व N बिंदूत स्पर्श करते. या वर्तुळाची त्रिज्या r आहे. सिद्ध करा, की : A(ΔABC) = `1/2`(AB + BC + AC) × r

 


सोबतच्या आकृतीत, `square`ABCD हा चक्रीय चौकोन आहे. m(कंस BC) = 90° आणि ∠DBC = 55°, तर ∠BCD चे माप काढा.



वरील आकृतीत जीवा PQ आणि जीवा RS एकमेकींना बिंदू T मध्ये छेदतात. जर ∠STQ = 58° आणि ∠PSR = 24°, तर ∠STQ = `1/2` [m(कंस PR) + m(कंस SQ)] या विधानाचा पडताळा घेण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

ΔPTS मध्ये,

∠SPQ = ∠STQ - `square`  .......[∵ त्रिकोणाच्या बाहयकोनाचे प्रमेय.]

∴ ∠SPQ = 34°

∴ m(कंस QS) = 2 × `square`° = 68°  .......[∵ `square`]

तसेच m(कंस PR) = 2∠PSR = `square`°

∴ `1/2` [m(कंस QS) + m(कंस PR)] = `1/2` × `square`° = 58°  .......(I)

परंतु  ∠STQ = 58° .........(II) [दिलेले]

∴ `1/2` [m(कंस PR) + m(कंस QS)] = ∠______   ........[(I) व (II) वरून]


वरील आकृतीत ∠L = 35° असेल, तर

  1. m(कंस MN) = किती?
  2. m(कंस MLN) = किती?

उकल:

  1. ∠L = `1/2` m(कंस MN) ............(अंतर्लिखित कोनाचे प्रमेय)
    ∴ `square = 1/2` m(कंस MN)
    ∴ 2 × 35 = m(कंस MN)
    ∴ m(कंस MN) = `square`
  2. m(कंस MLN) = `square` - m(कंस MN) ...........(कंसाच्या मापाची व्याख्या)
    = 360° - 70°
    ∴ m(कंस MLN) = `square`

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×