Advertisements
Advertisements
Question
आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.
आप्पांचे शिक्षणप्रेम - ______
Solution
आप्पांचे शिक्षणप्रेम - मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात, ते खिडकीतून ऐकत असतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे लिहा.
पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण ______
कारणे लिहा.
आजची मुले सुदैवी आहेत, कारण ______
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त ______
शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा ______
आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.
स्वच्छता - ______
चौकटी पूर्ण करा.
‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.
आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (२)
- मधमाशा किती कष्ट करून मध गोळा करतात हे मुलांनी पाहिले तर .....
- मुले मध गोळा करायला शिकतील.
- मधमाशा मध कशा गोळा करतात हे समजेल.
- मुलांना कष्टांची किंमत आणि गंमतपण कळेल.
- मधमाशा दररोज किती मध गोळा करतात हे समजेल.
- मुंबईतील नळ दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीच्या कामाचा परिणाम.....
- काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचले.
- सगळेजण नळ दुरुस्त करायला शिकले.
- सगळ्यांच्या डोळ्यांतून पाणी आले.
- आता मुंबईत एकही नळ नादुरुस्त नाही.
मी तुम्हांला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाश्यांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती; पण आता खिडकी उघडा. त्या मधमाश्या नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हांला कष्टाची किंमत आणि गंमतपण कळेल. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. ओळख नसली तरी आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितेय? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशांतून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. |
२) पुढील कृतीतून दिसून येणारा गुण ओळखा. (२)
अ) वाढदिवसाचे पैसे नाल्यावरील पूल बांधण्यासाठी दिले......
ब) काय ते लिहा.
पाण्याचा वाया जाणारा थेंब वाचवणे म्हणजे ...........
३) स्वमत- (३)
'पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे', आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.