English

शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा ______

Options

  • तो रोज उपस्थित असतो.

  • तो सर्वांची काळजी घेतो.

  • तो चांगलं काम करतो.

  • तो सर्वांशी चांगले बोलतो.

MCQ
Fill in the Blanks

Solution

शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा तो चांगलं काम करतो.

shaalaa.com
आप्पांचे पत्र
  Is there an error in this question or solution?
Chapter 10.1: आप्पांचे पत्र - कृती [Page 35]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 10.1 आप्पांचे पत्र
कृती | Q (३) (आ) | Page 35

RELATED QUESTIONS

कारणे लिहा.

पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण ______


कारणे लिहा.

आजची मुले सुदैवी आहेत, कारण ______


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त ______ 


आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.

आप्पांचे शिक्षणप्रेम - ______


आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.

स्वच्छता - ______


चौकटी पूर्ण करा.


‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.


‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.


आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) चौकट पूर्ण करा.  (२)

i. शिक्षकदिनाच्या दिवशी फार कमी निवडले जायचे ते पद ______
ii. समुद्रकिनारी वाळूचे शिल्प बनवणारे ______

 

आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार, म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षकदिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाहीतर शिक्षक तरी; पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही; पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे कोणतंही काम केलं, तरी ते असं करायचं, की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरच बघा. चार्जर नसला तर मोबाइलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्सपण महत्त्वाची असते. तुम्ही बघा क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात; पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे, की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले.

२) जोड्या जुळवा.  (२)

'अ' गट 'ब' गट
क्रिकेटच्या सामन्याचा निर्णय ठरवणारी नर्स
हा नसेल तर मोबाइलचा उपयोग नाही बिस्मिल्लाह खान
डॉक्टर बरोबर ही असावीच लागते खेळपट्टी
सनई वादनाने लोकप्रिय झालेले चार्जर

३) स्वमत- (३)

शाळेतील शिक्षकदिनाच्या दिवशी तुम्ही कोणते पद स्वीकारता किंवा कोण व्हायला आवडते व का? ते लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.  (२)

  • मधमाशा किती कष्ट करून मध गोळा करतात हे मुलांनी पाहिले तर .....
  1. मुले मध गोळा करायला शिकतील.
  2. मधमाशा मध कशा गोळा करतात हे समजेल.
  3. मुलांना कष्टांची किंमत आणि गंमतपण कळेल.
  4. मधमाशा दररोज किती मध गोळा करतात हे समजेल.
  • मुंबईतील नळ दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीच्या कामाचा परिणाम.....
  1. काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचले.
  2. सगळेजण नळ दुरुस्त करायला शिकले.
  3. सगळ्यांच्या डोळ्यांतून पाणी आले.
  4. आता मुंबईत एकही नळ नादुरुस्त नाही.
मी तुम्हांला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाश्यांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती; पण आता खिडकी उघडा. त्या मधमाश्या नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हांला कष्टाची किंमत आणि गंमतपण कळेल. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. ओळख नसली तरी आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितेय? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशांतून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले.

२) पुढील कृतीतून दिसून येणारा गुण ओळखा.  (२)

अ) वाढदिवसाचे पैसे नाल्यावरील पूल बांधण्यासाठी दिले......

ब) काय ते लिहा.

पाण्याचा वाया जाणारा थेंब वाचवणे म्हणजे ...........

३) स्वमत-   (३)

'पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे', आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×