English

∠ABC = 60°. ∠ABC चा दुभाजक काढा. कोनदुभाजकावर बिंदू Q असा घ्या, की d(B,Q) = 8 सेमी. Q केंद्र असलेले असे वर्तुळ काढा, की किरण BA व किरण BC ला स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या व स्पर्शिकाखंडाची - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

∠ABC = 60°. ∠ABC चा दुभाजक काढा. कोनदुभाजकावर बिंदू Q असा घ्या, की d(B,Q) = 8 सेमी. Q केंद्र असलेले असे वर्तुळ काढा, की किरण BA व किरण BC ला स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या व स्पर्शिकाखंडाची लांबी लिहा.

Sum

Solution

कच्ची आकृती 

विश्लेषण:

आकृतीत दर्शवल्याप्रमाणे,

किरण BA ही वर्तुळाला बिंदू R वर स्पर्श करणारी स्पर्शिका आहे.

BQ = 8 सेमी

∴ रेख QR ⊥ किरण BA … (i) [स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]

∴ वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी आपण बिंदू Q वरून किरण AB वरील बिंदू R वर लंब काढू.

ΔBQR मध्ये,

∠R = 90° ................[(i) वरून]

∠B = 30° ….... [किरण BQ हा ∠ABC = 60° चा कोन दुभाजक आहे.]

∴ ∠Q = 60° … [त्रिकोणाचा उर्वरित कोन]

∴ ∠BQR हा 30° - 60° - 90° त्रिकोण आहे.

∴ BR = `sqrt3/2`BQ ...........[60° कोनासमोरील बाजू]

∴ BR = `4sqrt3` सेमी

आणि QR = `1/2` BQ .............[30° कोनासमोरील बाजू]

QR = 4 सेमी

रचनेच्या पायऱ्या:

  1. ∠ABC = 60° काढा. त्याचा कोनदुभाजक काढा व त्यावर बिंदू Q असा घ्या, की d(B,Q) = 8 सेमी
  2. Q बिंदूवरून किरण BA वरील बिंदू R वर लंब काढा.
  3. Q हे केंद्र व OR ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा.
    ∴ त्रिज्या = 4 सेमी व स्पर्शिकाखंड `4sqrt3` सेमी
    त्रिज्येची लांबी = 4 सेमी
    स्पर्शिकाखंडाची लांबी = `4sqrt3` सेमी  
shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: भौमितिक रचना - Q ५)

APPEARS IN

SCERT Maharashtra Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC
Chapter 4 भौमितिक रचना
Q ५) | Q १२)

RELATED QUESTIONS

वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतात. 


त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा.


O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा.
वर्तुळावर कोणताही एक बिंदू P घ्या.
किरण OP काढा.
किरण OP ला P मधून लंब रेषा काढा.

रेख AB 6 सेमी व्यास असलेले वर्तुळ काढा. व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.


O केंद्र व 3.4 त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मधून स्पर्शिका काढा. 


4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


३ सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. चौरसाची प्रत्येक बाजू वर्तुळाला स्पर्श करेल असा चौरस काढा.


O केंद्र व त्रिज्या 2.8 सेमी असलेल्या वर्तुळाला P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला PA व PB या स्पर्शिका अशा काढा, की ∠APB = 70° 


रेख AB = 7.5 सेमी लांबीचा काढा. केंद्र A असलेले वर्तुळ असे काढा, की वर्तुळाला बिंदू B मधून काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 6 सेमी असेल.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×