Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे दया.
भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
Solution 1
- भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 46 टक्क्यांहून अधिक लोक शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत.
- उत्तर भारतात, गंगाच्या मैदानांमध्ये विस्तीर्ण सुपीक गाळाची माती आहे, जी शेतीसाठी अत्यंत योग्य आहे.
- दक्षिणी द्वीपकल्पीय भारतात, अत्यंत सुपीक काळी कपाशी माती आढळते, जी विविध पिकांसाठी अनुकूल आहे.
- किनारपट्टी भागांमध्ये, कृष्णा, गोदावरी, महानदी, तापी, नर्मदा या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात सुपीक माती आढळते.
- गंगा, यमुना, गोदावरी, तापी, नर्मदा आणि त्यांच्या हजारो उपनद्या व कालवे यांच्यामुळे सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे.
- कृषी विकासासाठी श्रमशक्ती, बाजार, भांडवल, वाहतूक सुविधा, साठवणूक सुविधा आणि शासनाची धोरणे यांसारखे आर्थिक आणि सामाजिक घटक अनुकूल आहेत.
Solution 2
भारत हा आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश असून, येथे प्रामुख्याने मोसमी हवामान आढळते. भारतात मोसमी हवामाना मुळे निश्चित पर्जन्याची उपलब्धता, सम हवामान आणि अनेक नद्यांची खोरी यांमुळे शेतजमिनीची उपलब्धता आहे. लोकसंख्या खूप जास्त असून, अन्न आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची गरज भागवण्यासाठी शेती हाच प्रमुख पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळेच भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो आणि हा शेती व्यवसाय प्रामुख्याने सखोल उदरनिर्वाह स्वरूपाचा शेती व्यवसाय आहे. येथील प्रमुख पीक तांदूळ असून बहुतांश उत्पादन हे स्थानिक बाजारपेठेत उदरनिर्वाहासाठी वापरले जाते. पारंपरिक शेती पद्धती, जमिनीचे क्षेत्र कमी, मजुरांची भरपूर उपलब्धता त्यामुळे मानवी श्रमाचा शेतीमध्ये वापर जास्त, आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणाचा वापर खूपच कमी प्रमाणात ही येथील शेती व्यवसायाची वैशिष्ट्ये आहेत.
RELATED QUESTIONS
विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये ______.
सांगड घालून साखळी पूर्ण करा:
'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ | 'क' स्तंभ |
सखोल उदरनिर्वाह शेती | डॉगर बँक | शेतीचा आकार लहान |
पंपाज गवताळ प्रदेश | किनाऱ्यापासून दूर, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन | प्रतिकूल परिस्थिती |
मत्स्यक्षेत्र | तांदूळ | बॉम्बे हाय |
फळे, कंदमुळे गोळा करणे | घनदाट वने | ईशान्य अटलांटिक महासागर |
खाणकाम | व्यापारी पशुपालन | दक्षिण अमेरिका |
मळ्याची शेती
विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
फरक सांगा.
मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती.
सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा.
मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा.
शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची २०१८ सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
खंड | प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी (सन २०१८) |
युरोप | ७.९१ |
आशिया | २४.४९ |
उत्तर अमेरिका | १४.९३ |
दक्षिण अमेरिका | १४.९४ |
आफ्रिका | ४७.२८ |
ऑस्ट्रेलिया | २७.७९ |
संदर्भ स्रोत: FAO- २०१८
१) कोणत्या खंडात १०% पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
२) कोणत्या खंडात ४०% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
३) दिलेल्या आकडेवारीकडे बघता, या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल काय?
विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो.