Advertisements
Advertisements
Question
बिंदू P व Q घ्या व त्यांमधून जाणारे वर्तुळ काढा. त्या वर्तुळाला AB ही स्पर्शिका काढा. (वर्तुळाच्या केंद्राचा वापर न करता)
Solution
विश्लेषण:
बिंदू P व Q मधून जाणाऱ्या वर्तुळाचे केंद्र P व Q बिंदूपासून समदूर असेल.
∴ ते रेख PQ च्या लंबदुभाजकावर असणार.
कच्ची आकृती
रचनेच्या पायऱ्या:
- कोणतेही दोन बिंदू P व Q घ्या व ते जोडा.
- PQ चा लंबदुभाजक काढा.
- या लंबदुभाजकावर कोणताही एक बिंदू O घ्या व O हे केंद्र आणि OP ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा.
- वर्तुळाच्या विशालकंसावर कोणताही एक बिंदू A घ्या व ΔPQA काढा.
- P हे केंद्र घेऊन आणि कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन ∠QPA च्या भुजांना बिंदू T आणि R मध्ये छेदणारा कंस काढा.
- A हे केंद्र घेऊन आणि कंपासमध्ये तेच अंतर घेऊन, जीवा QA ला बिंदू S वर छेदणारा कंस काढा.
- S हे केंद्र व TR ही त्रिज्या घेऊन आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढा. त्यांच्या छेदनबिंदूला B नाव द्या.
- रेख AB काढा. रेख AB ही वर्तुळाची अपेक्षित स्पर्शिका आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळकेंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा.
कोणतेही एक वर्तुळ काढा. त्यावर A हा बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळकेंद्राचा उपयोग न करता काढा.
3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर कोणताही एक बिंदू k घ्या. K मधून वर्तुळकेंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढा.
3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्राचा वापर न करता वर्तुळाला त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा.
वर्तुळकेंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
एक वर्तुळ काढा व वर्तुळावर कोणताही एक बिंदू C घ्या. |
↓ |
बिंदू C मधून जाणारी जीवा CB काढा. |
↓ |
वर्तुळावर B व C सोडून A हा बिंदू घ्या. ∠BAC काढा. |
↓ |
कंपासमध्ये सोयीस्कर त्रिज्या घेऊन बिंदू A केंद्र घेऊन ∠BAC च्या भुजांना बिंदू M व बिंदू N मध्ये छेदणारा कंस काढा. |
↓ |
तीच त्रिज्या व C केंद्र घेऊन जीवा BC ला छेदणारा कंस काढा. छेदनबिंदूस R नाव द्या. |
↓ |
कंपासमध्ये MN एवढी त्रिज्या घ्या. केंद्र R घेऊन आधी काढलेल्या कंसाला छेदणारा आणखी एक कंस काढा. छेदनबिंदूस D नाव द्या. |
↓ |
D मधून जाणारी रेषा CD काढा. रेषा CD ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. |
3.5 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर कोठेही बिंदू K घ्या. K मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा (वर्तुळकेंद्राचा वापर न करता).
3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून त्याची रेख XY ही जीवा 5 सेमी लांबीची काढा. बिंदू X व बिंदू Y मधून जाणार्या वर्तुळाच्या स्पर्शिका काढा (वर्तुळकेंद्राचा वापर न करता).
1.8 सेमी पेक्षा जास्त व 3 सेमी पेक्षा कमी त्रिज्या घेऊन कोणतेही एक वर्तुळ काढा. या वर्तुळात 3.6 सेमी लांबीची जीवा AB काढा. वर्तुळकेंद्राचा वापर न करता A व B मधून जाणाऱ्या वर्तुळाच्या स्पर्शिका काढा.