Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्पकथन लिहा:
Solution
शाळेची घंटा
आज सगळं काही खूप शांत वाटत आहे... का असं वाटतंय? अरे हो, विसरलेच! आज १५ एप्रिल आहे ना? मुलांची शाळा नाही आणि त्यामुळे मीही, शाळेची घंटा, वाजलेली नाही. निकालाच्या दिवसात तरी काय गरज आहे मला वाजायची? माझ्या आवाजाने शाळा सुरू होताना घाबरत वर्गाकडे धावणारी मुलं आणि शाळा सुटताना आनंदाने घराकडे धावणारी मुलं पाहायला आता थेट जून महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. पण खरं सांगू, मला माझ्या मुलांची खूप आठवण येते. त्यांनाही माझी, त्यांच्या शाळेच्या घंटेची, आठवण येत असेल का? बहुतेक नाही, कारण उन्हाळी सुट्टी म्हणजे त्यांच्यासाठी एक आनंदाचा सण असतो.
माझी निर्मितीच शाळेला शिस्तबद्ध ठेवण्यासाठी झाली आहे. शाळेत सगळ्या गोष्टी वेळेवर व्हाव्यात, हा उद्देशच माझ्या अस्तित्वाचा आधार आहे. माझ्या आवाजामुळेच शाळेतली सर्व कामं वेळेत होतात. मी वाजल्यावर लोकांना वेळेचं भान राहतं आणि त्याप्रमाणे पुढची कामं घडतात. शिकवणाऱ्या सर किंवा मॅडम शिकवण्यात गुंतले असले तरी तास संपल्याचं भान त्यांना मीच करून देते. आणि मुलांना शाळा सुरू झाल्याची किंवा सुटल्याची सूचना देखील मीच देते.
हो, आता मात्र माझं रूप बदललंय. आधी माझं पारंपरिक पंट्याचं स्वरूप होतं, आता बटनाच्या स्पर्शावर मी वाजते. पूर्वी मुलं माझा वेगळेपणा कौतुकाने न्याहाळायची, शिपाई मामांना हट्टाने "मी देतो घंटा!" म्हणायची. हे पाहून मी खूप सुखावून जायची. पण आता मी फक्त एक साधं उपकरण राहिले आहे, वेगळेपण हरवल्यासारखं वाटतं.
तरीही, माझ्या आवाजामुळे वेळेची जाणीव होते, हे सगळे मान्य करतात. पण किती जण खरंच वेळ पाळतात? हीच माझी खरी खंत आहे. वेळेचं महत्त्व सगळ्यांनी ओळखायला हवं. वेळेचं महत्त्व किती मोलाचं आहे, हे माझ्यासारख्या शाळेच्या घंटेपेक्षा कोण चांगलं समजू शकेल?