English

'ग्रंथ माझे गुरू' या विषयावर खालील मुद्द्यांना अनुसरून तुमचे विचार लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

'ग्रंथ माझे गुरू' या विषयावर खालील मुद्द्यांना अनुसरून तुमचे विचार लिहा.

Writing Skills

Solution

ग्रंथ माझे गुरू

ग्रंथांसारखा विश्वासू मित्र तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. ग्रंथ कधीही चुकीची दिशा दाखवत नाहीत. याचप्रमाणे, ग्रंथ आणि गुरु यांच्यात एक साम्य आहे. जसे गुरु नेहमी शिष्याला योग्य मार्गदर्शन करतात, तसेच ग्रंथ देखील वाचकाला ज्ञानाने समृद्ध करतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "वाचाल तर वाचाल" हा महत्त्वाचा संदेश दिला होता. अनेक लोक वाचनाचा कंटाळा करतात, परंतु वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. या झपाट्याने बदलणाऱ्या जगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवले नाही, तर आपण इतरांपासून मागे पडतो. आपली कामे चोख पार पाडण्यासाठी, आत्मविश्वासाने बोलण्यासाठी आणि विविध विषयांचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी वाचनाची सवय असणे गरजेचे आहे. वाचनामुळे अनेक फायदे होतात. इतरांनी अनुभवलेले प्रसंग आपण प्रत्यक्ष न जगताही त्यांचा अनुभव घेऊ शकतो. जग, देश, धर्म, भाषा आणि संस्कृती यांसारख्या विविध गोष्टींची माहिती वाचनातून मिळते. प्रवासवर्णने वाचून अनोख्या ठिकाणांची ओळख होते.

मोठमोठ्या व्यक्तींची चरित्रे आणि आत्मचरित्रे वाचून प्रेरणा मिळते. काही चांगली पुस्तके आपले जीवन बदलण्यास कारणीभूत ठरू शकतात. कथा, कादंबऱ्या किंवा कविता वाचूनही आपले विचार परिपक्व होतात. वाचनामुळे माणूस चिंतनशील होतो, गोष्टींचा सखोल विचार करण्याची सवय लागते. या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी वाचनाद्वारे आपले ज्ञान वाढवणे अपरिहार्य आहे.

ग्रंथांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. अभ्यासविषयक ग्रंथ, साहित्य, कथा-कादंबऱ्या अशा वेगवेगळ्या स्वरूपातील ग्रंथ वाचायला मिळतात. आधुनिक काळात ग्रंथांचे स्वरूपही बदलले आहे. मोठ्या आणि जड पुस्तकांना प्रवासात नेणे कठीण होते, पण डिजिटल स्वरूपात ग्रंथ पीडीएफ किंवा ई-बुक्स स्वरूपात सहज उपलब्ध असल्याने वाचन अधिक सोपे झाले आहे.

ग्रंथ कोणत्याही स्वरूपात असले तरी ते खऱ्या अर्थाने गुरु आहेत, कारण प्रत्येक ग्रंथ काही ना काही शिकवतोच. डिजिटल असो किंवा छापील, ग्रंथाचे महत्त्व अपरंपार आहे, आणि ते माणसाला ज्ञानाच्या दिशेने मार्गदर्शन करणारे गुरुप्रमाणेच आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×