Advertisements
Advertisements
Question
एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 3 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 9 चौरस एककाने कमी होते. जर लांबी 3 एककाने कमी केली व रुंदी 2 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 67 चौरस एककाने वाढते, तर आयताची लांबी व रुंदी काढा.
Solution
आयताची लांबी x एकक व रुंदी y एकक मानू.
∴ आयताचे क्षेत्रफळ = xy चौ. एकक
आयताची लांबी 5 एककाने कमी केली आहे.
∴ लांबी = x – 5
आयताची रुंदी 3 एककांनी वाढवली आहे.
∴ रुंदी = y + 3
आयताचे क्षेत्रफळ 9 चौरस एककांनी कमी होते.
∴ आयताचे क्षेत्रफळ = xy – 9
दिलेल्या पहिल्या अटीनुसार,
(x – 5) (y + 3) = xy – 9
∴ xy + 3x – 5y – 15 = xy – 9
∴ 3x – 5y = -9 + 15
∴ 3x – 5y = 6 ...(i)
आयताची लांबी 3 एककांनी कमी केली.
∴ लांबी = x – 3
आयताची रुंदी 2 एककांनी वाढवली.
∴ रुंदी = y + 2
आयताचे क्षेत्रफळ 67 चौरस एककने वाढले.
∴ आयताचे क्षेत्रफळ = xy + 61
दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार,
(x – 3) (y + 2) = xy + 67
∴ xy + 2x – 3y – 6 = xy + 67
∴ 2x – 3y = 67 + 6
∴ 2x – 3y = 73 ...(ii)
समीकरण (i) ला 3 ने गुणू.
9x – 15y = 18 ...(iii)
समीकरण (ii) ला 5 ने गुणू.
10x – 15y = 365 ...(iv)
समीकरण (iii) मधून समीकरण (iv) वजा करून,
10x – 15y = 365
9x – 15y = 18
– + –
–x = –347
∴ x = 347
x = 347 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवू,
2x – 3y = 73
∴ 2(347) – 3y = 73
∴ 694 – 73 = 3y
∴ 621 = 3y
∴ y = `621/3`
∴ y = 207
∴ आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 347 एकक व 207 एकक आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा
एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणिसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.
संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला व 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला, तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम काढा.
3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4500 रुपये आहे. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7000 रुपये आहे, तर 2 खुर्च्या व 2 टेबलांची एकूण किंमत काढा.
ΔABC मध्ये कोन A चे माप हे ∠B व ∠C या कोनांच्या मापांच्या बेरजेएवढे आहे. तसेच ∠B व ∠C यांच्या मापांचे गुणोत्तर 4:5 आहे. तर त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे काढा.
एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर उत्तराकरिता 2 गुण आणि चुकीच्या उत्तराकरिता ॠण एक गुण देण्यात येणार होता. यशवंतने सर्व 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 90 गुण मिळाले, तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली होती?
एक दोन अंकी संख्या, त्या संख्येतील अंकांच्या बेरजेच्या चौपटीपेक्षा 3 ने मोठी आहे. जर त्या संख्येमध्ये 18 मिळवले तर येणारी बेरीज ही मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मिळते, तर ती संख्या काढा.
दोन व्यक्तींच्या उत्पन्नांचे गुणोत्तर 9 : 7 आहे व त्यांच्या खर्चांचे गुणोत्तर 4 : 3 आहे. प्रत्येकाची बचत 200 रुपये असेल तर प्रत्येकाचे उत्पन्न काढा.
एका रस्त्यावरील A व B या दोन ठिकाणांमधील अंतर 70 किमी आहे. एक कार A ठिकाणाहून व दुसरी कार B या ठिकाणाहून निघते. जर त्या एकाच दिशेने निघाल्या तर एकमेकींना 7 तासात भेटतात व विरुद्ध दिशेने निघाल्यास 1 तासात भेटतात, तर त्यांचे वेग काढा.
एक दोन अंकी संख्या व त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 99 आहे, तर ती संख्या काढा.