Advertisements
Advertisements
Question
एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक `1/2` शी सममूल्य होतो तर तो अपूर्णांक कोणता?
Sum
Solution
अपूर्णांकाचा अंश x मानू.
∴ छेद = x + 12
∴ अपूर्णांक = `x/(x + 12)`
त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक `1/2` शी सममूल्य होतो.
दिलेल्या माहितीवरून,
`(x - 2)/(x + 12 + 7) = 1/2`
⇒ 2(x − 2) = 1( x + 12 + 7)
⇒ 2x − 4 = x + 19
⇒ 2x − x = 19 + 4
⇒ x = 23
∴ अपूर्णांकाचा अंश 23 आहे.
∴ अपूर्णांकाचा छेद 23 + 12 = 35 आहे.
म्हणून, अपूर्णांक `23/35` आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?