Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
Distinguish Between
Solution
देणारा प्रदेश | घेणारा प्रदेश | |
(१) | ज्या प्रदेशातून लोक स्थलांतरित होतात, त्या मूळ प्रदेशाला देणारा प्रदेश म्हणतात. | मूळ प्रदेशातून लोक ज्या प्रदेशात स्थलांतरित होतात, अशा प्रदेशाला घेणारा प्रदेश म्हणतात. |
(२) | स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना आणि गुणवैशिष्ट्ये बदलतात. | स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना आणि गुणवैशिष्ट्ये बदलतात. |
(३) | स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते, तसेच तेथील लोकसंख्येची घनताही कमी होते. | स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या जास्त होते, तेथील लोकसंख्येची घनता वाढते. |
(४) | स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील वय रचना बदलते; बहुतांशी वेळेस लिंग गुणोत्तर बदलते आणि दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण वाढते. | स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढते; लिंग गुणोत्तर बदलते आणि दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी आढळते. |
(५) | देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी झाल्यामुळे काही वेळेस शेती उदयोगासारख्या स्थानिक आर्थिक व्यवसायांना मजुरांचा तुटवडा पडतो. | घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या जास्त झाल्यामुळे बेकारी वाढते, काही वेळेस मजुरांचे किंवा स्थलांतरित लोकांचे शोषण होते. |
(६) | काही निवडक प्रदेशांत स्थलांतरित झालेल्या लोकांच्या मनिऑर्डर वर देणाऱ्या प्रदेशांचा काही प्रमाणात विकास होताना दिसतो. | घेणाऱ्या प्रदेशात घरांचा तुटवडा, झोपडपट्टी, गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, प्रदूषण अशा समस्या उद्भवतात. |
shaalaa.com
स्थलांतर
Is there an error in this question or solution?