Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
निसर्गवाद आणि संभाव्यवाद.
Distinguish Between
Solution 1
संभाव्यवाद | निसर्गवाद |
काही भूगोलतज्ज्ञ मते मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो, यास संभाव्यवाद असे म्हणतात. | काही भूगोल तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून निसर्ग हा मानवोपेक्षा श्रेष्ठ आहे, यास निसर्गवाद असे म्हणतात. |
बुद्धीमत्तेमुळे, मनुष्य नैसर्गिक वातावरणात बदल घडवून आणतो. | निसर्गवादानुसार, मानवी इतिहास, संस्कृती, समाज, जीवनशैली इत्यादींचा विकास त्यांच्या भौतिक पर्यावरणाने घडवला जातो. |
निसर्गात मनुष्याने केलेल्या बदलांना मर्यादा असतात. | भौतिक पर्यावरणाच्या मानवी क्रियांवर होणाऱ्या परिणामांवर कोणत्याही मर्यादा नाहीत. |
shaalaa.com
Solution 2
निसर्गवाद | संभाव्यवाद | |
(१) | काही भूगोल तज्ज्ञांच्या मते, निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो नेहमीच श्रेष्ठ राहील, तसेच मानवाच्या क्रिया आणि जीवन निसर्गाच्या मर्यादेत राहील असा निसर्ग वाद मांडण्यात आला. | काही तज्ज्ञांच्या मते, मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो आणि मानव त्याला हवा तसा निसर्गाचा वापर करून आपले जीवन आणि जीवनशैली वेगळ्या प्रकारे विकसित करू शकतो. हा संभाव्यवाद मांडण्यात आला. |
(२) | निसर्ग हा सर्वश्रेष्ठ असून मानवी विकासाला निसर्गाकडून मर्यादा पडतात आणि या मर्यादा मानवाला स्वीकाराव्याच लागतात. ही विचारसरणी म्हणजे निसर्गवाद होय. | याउलट मानव आपल्या बुद्धी व कौशल्याच्या आधारे नैसर्गिक मर्यादांवर उपाय शोधून विकासाची घोडदौड चालू ठेवू शकतो. ही विचारसरणी म्हणजे संभाव्यवाद होय. |
(३) | मानवाने कितीही तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती केली असली, तरी आजही निसर्गाच्या अनेक घटना मानवी मर्यादा स्पष्ट करतात. | मानवाने गेल्या दोनशे वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे केलेली प्रगती आणि त्याद्वारे निसर्गात प्रसंगी हस्तक्षेप करण्याचीही त्यांनी प्राप्त केलेली क्षमता या गोष्टींचा दाखला संभाव्य वाद विचारसरणीचे प्रवर्तक देतात. |
(४) | इतकेच नव्हे तर, कुठलाही वैज्ञानिक आणि तांत्रिक विकास या घटनांना नियंत्रित करण्यास सक्षम नसतो. हे अनेक घटनांमधून दिसूनही आले आहे. उदा., भूकंप, पूर, चक्रीवादळामुळे होणारे नुकसान, रोगराई, भूस्खलन, नैसर्गिक पर्यावरणामधील प्रदूषण आणि त्याद्वारे मानवाला होणारा त्रास इत्यादी अनेक उदाहरणे निसर्ग वादास बळकटी देतात. | मानवाने भूरूपांमध्ये केलेले बदल, पूल बांधणी, बोगद्यांची निर्मिती या माध्यमातून झालेला वाहतुकीचा विकास, संकरित बियाण्यांच्या विकासाद्वारे शेती उत्पादनात झालेली भरघोस वाढ, काही रोगांवर मिळवलेले नियंत्रण इत्यादी अनेक उदाहरणे संभाव्य वादास बळकटी देतात. |
shaalaa.com
विद्याशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडित आहे.
भूगोलविषयाचे स्वरूप गतिशील आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे.
प्राकृतिक भूगोल विज्ञानाच्या विविध शाखांमधील संबंध
भूगोलाच्या शाखा.
भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.
भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य
अचूक गट ओळखा.
पुढील चुकीचा घटक ओळखा.
भूगोल अभ्यासकाची कौशल्ये -
पुढील चुकीचा घटक ओळखा.
प्राकृतिक भूगोलाच्या शाखा -