Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल
Distinguish Between
Solution
प्राकृतिक भूगोल | मानवी भूगोल | |
(१) | नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणजेच पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. | मानव आणि पर्यावरण यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संबंधांमुळे पृथ्वीवर नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरणाबरोबरच मानवनिर्मित पर्यावरणाचेही स्वतंत्र स्थान निर्माण झाले. मानवनिर्मित पर्यावरणाची एक स्वतंत्र अशी वेगळी शाखा निर्माण झाली. भूगोलाची ही वेगळी शाखा म्हणजेच मानवी भूगोल होय. |
(२) | प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने पृथ्वीवरील प्राकृतिक घटक म्हणजेच नैसर्गिक घटक केंद्रस्थानी असतात. | मानवी क्रियांमुळे मानवावर आणि निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. |
(३) | प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास केला जातो. | मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी आहे. |
(४) | शिलावरणाच्या अभ्यासात प्रामुख्याने भू म्हणजे जमिनीशी संबंधित विषयांचा अभ्यास केला जातो. जलावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील पाणी आणि त्यासंबंधित विविध घटकांचा अभ्यास केला जातो. वातावरणाच्या अभ्यासात वायू किंवा हवा आणि त्यांचे पृथ्वी सभोवतालचे आवरण या विषयांचा अभ्यास केला जातो. जीवावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील सजीव आणि त्यांचा पृथ्वीवरील अन्नघटकांशी येणारा संबंध या सहसंबंधांचा अभ्यास केला जातो. | मानवी भूगोलात मानवाने प्राकृ घटकांचा उपयोग करून उभारलेले आपले स्वतःचे विश्व किंवा मानवी घटक यांचा अभ्यास केला जातो. यात प्रामुख्याने आर्थिक क्रिया, सामाजिक रचना, राजकीय व्यवस्था आणि सांस्कृतिक विकास या अभ्यासविषयांचा समावेश होतो. |
(५) | खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र भूगर्भशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र, जीव भूगोल या प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखा आहेत. या सर्व शाखा एकमेकांशी निगडित आहेत. | लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक भूगोल, प्रादेशिक भूगोल आणि शहरी भूगोल या विशेष शाखांसह वसाहत भूगोल या मानवी भूगोलाच्या विविध शाखा आहेत. या सर्व उपशाखा कमी-अधिक प्रमाणात एकमेकांशी निगडित आहेत. |
shaalaa.com
भूगोलाची व्याप्ती
Is there an error in this question or solution?