English

इलेक्ट्रॉनिक पद्‌धतीदवारे कर्जरोख्यावरील व्याज देण्याबाबतचे पत्र कर्जरोखेधारकास लिहा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

इलेक्ट्रॉनिक पद्‌धतीदवारे कर्जरोख्यावरील व्याज देण्याबाबतचे पत्र कर्जरोखेधारकास लिहा.

Answer in Brief

Solution

हल्क मोटर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. 05, कमर्शियल टॉवर,
पी.के. रोड, मुंबई - ४०००६७

CIN: R20020 MH 1000 PLC123456

वेबसाईट: wwww.hulkmotors.in
ई-मेल: [email protected]
दि. १७ ऑक्टोबर, २०२०

फोन: ०२२ १२३४५६७८
फॅक्स: ०२२ - ११११२२२२
संदर्भ क्र.: सी/२०६०/२०-१८
श्रीमान जॉन मेथ्यू
५०८, लोकेश अपार्टमेंट्स,
ए.के.डी. रस्ता,
मुंबई – ४००००८९

विषय: कर्जरोख्यावरील व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धती
(ECS or NEFT)

महोदया,

       संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येत आहे की दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत आपण खरेदी केलेल्या प्रत्येकी रु. १०० किंमत असलेल्या परतफेडीच्या कर्जरोख्यांवर व्याज १०% दराने ३१ मार्च २०२० रोजी संपणाऱ्या वर्षासाठी देण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला.

       कंपनीने कर्जरोख्यांवरील व्याज देण्यासंबंधी सर्व तरतुदींचे पालन केले असून सदर व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे (ECS/NEFT)अदा करण्यात येईल त्याचा तपशील खालीलप्रमाणे:

रजिस्टर क्रमांक कर्जरोख्यांची संख्या अनुक्रमांक एकूण व्याज टी. डी. एस. १०% निव्वळ व्याज
    पासून पर्यंत      
D-१२३ १०० ९०१ १००० ₹ १,००० NIL ₹ १,०००

आपण कंपनीकडे दिलेल्या बँक खात्याच्या तपशीलानुसार देय असलेल्या व्याजाची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वर्ग करण्यात येईल.

कळावे.

   आपला विश्वासू ,
हल्क मोटर्स लिमिटेड करिता

 सही          
श्री. कमलेश गायकवाड
कंपनी चिटणीस

shaalaa.com
कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार - नमुना पत्रे
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×