English

‘झाडाचे मानवी जीवनातील स्थान’, याविषयी तुमचे विचार लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

‘झाडाचे मानवी जीवनातील स्थान’, याविषयी तुमचे विचार लिहा.

Short Note

Solution

मानवी जीवनात झाडाचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. झाडांचे अस्तित्व माणसात चैतन्य निर्माण करते. झाडे असतील, तर तेथे पक्षी, प्राणी राहतात. त्यांच्या किलबिलाटाने, आवाजाने वातावरण प्रसन्न होते. घनदाट वृक्षराजीमुळे जलचक्र सुरळीत चालते. पाऊस पुरेशा प्रमाणात व वेळेवर पडतो.

झाडांच्या दाट सावलीत थकलाभागला वाटसरू विश्रांती घेतो. तेथे त्याला विसावा मिळतो, शांती मिळते. तापलेल्या उन्हापासून बचाव होतो. झाडांमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. हिरव्यागार झाडांमुळे सृष्टीत अनोखे साैंदर्य पाहायला मिळते, वातावरण ताजे, प्रफुल्लित होते.

झाडे नसतील, तर सर्व वातावरण भकास होईल. डोंगर उघडेबोडके होतील. पक्ष्यांची, प्राण्यांची निवासस्थाने नष्ट होतील. तापमानात वाढ होईल. जलचक्र बिघडेल, शेतीभातीचे नुकसान होईल. असे सर्व वाईट परिणाम टाळण्याकरता झाडे लावणे व टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

shaalaa.com
हिरवंगार झाडासारखं
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: हिरवंगार झाडासारखं - कृती [Page 51]

APPEARS IN

Balbharati Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 13 हिरवंगार झाडासारखं
कृती | Q (६)(आ) | Page 51

RELATED QUESTIONS

वाक्य पूर्ण करा.

कवीने झाडाला दिलेली उपमा- 


वाक्य पूर्ण करा.

अलगद उतरणारे थेंब- 


वाक्य पूर्ण करा.

फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ- 


आकृती पूर्ण करा.


खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

हसावं कसं सळसळत्या पानासारखं.


खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं.


‘झाडापासून आनंदी जगणे शिकावे’, या विधानातील विचार स्पष्ट करा


खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:

मुद्दे हिरवंगार झाडासारखं
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - झाड बसते
ध्यानस्थ ऋषिसारखं
मौन व्रत धारण करून
तपश्चर्या करत...
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -  
(5) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा - (i) मौन -
(ii) मुकाट - 
(iii) वस्त्र -
(iv) ब्राहू -

खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘हिरवंगार झाडासारखं’
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(२) कवितेचा रचनाप्रकार -  
(३) कवितेचा काव्यसंग्रह -  
(४) कवितेचा विषय -  
(५) कवितेतील आवडलेली ओळ -  
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे -  

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘हिरवंगार झाडासारखं’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर।
अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) खुडलेल्या -
(ii) पालवी -
(iii) मरगळ -
(iv) मंजुळ -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×