English

काव्यसौंदर्य. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्यालादार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुलाबागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहूनपण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली - Marathi

Advertisements
Advertisements

Question

काव्यसौंदर्य.

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,

या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.

Long Answer

Solution

'आरशातली स्त्री' या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.
आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते - तू अंतर्बाह्य बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस. आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही. पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस. त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाह्य बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.
'वाट पाहणारे प्रेयस चांदणे', 'पेंगुळलेली अल्लड जुई' या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात 'अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी' या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

shaalaa.com
आरशातली स्त्री
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.11: आरशातली स्त्री - कृती [Page 52]

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 2.11 आरशातली स्त्री
कृती | Q (४) | Page 52

RELATED QUESTIONS

कृती करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन


कृती करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश


वर्णन करा.

आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल-


वर्णन करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-


खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.

तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.


खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.


जोड्या जुळवा.

'अ' गट

‘ब’ गट

(१) अंतरीचे सुंदर पूर्वरंग (अ) मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस
(२) आभाळ झुल्यावर झुलणारी (आ) परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
(३) देह तोडलेले फूल (इ) उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
(४) पारंपरिकतेचे वरदान (ई) कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
(५) पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा (उ) मनातले सुंदर भाव

खालील ओळींचा अर्थ लिहा.

माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य!


खालील ओळींचा अर्थ लिहा.

स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!


रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली-
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’


अभिव्यक्ती.

‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.


‘रडू नकोस खुळे, उठ!
आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा.


अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी

या ओळीचे रसग्रहण करा.


खालील ओळींचा अर्थ लिहा:

आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस
          ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन
         देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे
        वरदान समजून


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×