Advertisements
Advertisements
Question
केंद्र C असलेल्या वर्तुळाच्या रेख PM आणि रेख PN ह्या एकरूप जीवा आहेत, तर किरण PC हा ∠NPM चा दुभाजक आहे. हे सिद्ध करा.
Solution
पक्ष: बिंदू C हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे.
जीवा PM ≅ जीवा PN
साध्य: किरण PC हा ∠NPM चा दुभाजक आहे.
सिद्धता:
रेख CM व रेख CN काढा.
∆CPM व ∆CPN मध्ये,
रेख PM ≅ रेख PN ...(पक्ष)
रेख PC ≅ रेख PC ...(सामाईक भुजा)
रेख CM ≅ रेख CN ...(एकाच वर्तुळाच्या त्रिज्या)
∴ ∆CPM ≅ ∆CPN ...(बाबाबा कसोटी)
∴ ∠CPM ≅ ∠CPN ...(एकरूप त्रिकोणाचे संगत कोन)
∴ किरण PC हा ∠NPM चा दुभाजक आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या दोन जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळकेंद्रापासून किती अंतरावर असतील?
एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे तर त्या जीवांची लांबी काढा.