Advertisements
Advertisements
प्रश्न
केंद्र C असलेल्या वर्तुळाच्या रेख PM आणि रेख PN ह्या एकरूप जीवा आहेत, तर किरण PC हा ∠NPM चा दुभाजक आहे. हे सिद्ध करा.
बेरीज
उत्तर
पक्ष: बिंदू C हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे.
जीवा PM ≅ जीवा PN
साध्य: किरण PC हा ∠NPM चा दुभाजक आहे.
सिद्धता:
रेख CM व रेख CN काढा.
∆CPM व ∆CPN मध्ये,
रेख PM ≅ रेख PN ...(पक्ष)
रेख PC ≅ रेख PC ...(सामाईक भुजा)
रेख CM ≅ रेख CN ...(एकाच वर्तुळाच्या त्रिज्या)
∴ ∆CPM ≅ ∆CPN ...(बाबाबा कसोटी)
∴ ∠CPM ≅ ∠CPN ...(एकरूप त्रिकोणाचे संगत कोन)
∴ किरण PC हा ∠NPM चा दुभाजक आहे.
shaalaa.com
एकरूप जीवांचे गुणधर्म
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?