Advertisements
Advertisements
Question
खालील आकृती मध्ये रेख AB || रेख PQ , रेख AB ≅ रेख PQ, रेख AC || रेख PR, रेख AC ≅ रेख PR तर सिद्ध करा की, रेख BC || रेख QR व रेख BC ≅ रेख QR.
Solution
पक्ष: रेख AB || रेख PQ , रेख AB ≅ रेख PQ,
रेख AC || रेख PR, रेख AC ≅ रेख PR
साध्य: रेख BC || रेख QR व रेख BC ≅ रेख QR.
सिद्धता:
`square`ABQP मध्ये,
रेख AB || रेख PQ
रेख AB ≅ रेख PQ ...(पक्ष)
∴ `square`ABQP हा समांतरभुज चौकोन आहे. ...(चौकोनाच्या संमुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज असतो.)
∴ रेख AP || रेख BQ ...(i)
∴ रेख AP ≅ रेख BQ ...(ii) ...(समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा)
`square`ACRP मध्ये,
रेख AC || रेख PR
रेख AC ≅ रेख PR ...(पक्ष)
∴ `square`ACRP हा समांतरभुज चौकोन आहे. ...(चौकोनाच्या संमुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज असतो.)
∴ रेख AP || रेख CR ...(iii)
∴ रेख AP ≅ रेख CR ...(iv) ...(समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा)
`square`BQRC मध्ये,
रेख BQ || रेख CR ...[(i) व (iii) वरून]
रेख BQ ≅ रेख CR ...[(ii) व (iv) वरून]
∴ `square`BQRC हा समांतरभुज चौकोन आहे. ...(चौकोनाच्या संमुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज असतो.)
∴ रेख BC || रेख QR
∴ रेख BC ≅ रेख QR ...(समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा)
APPEARS IN
RELATED QUESTIONS
एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेमी मोठी आहे. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.
एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर 1 : 2 आहे. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे काढा.
खालील आकृती मध्ये `square`PQRS व `square`ABCR हे दोन समांतरभुज चौकोन आहेत. ∠P = 110° तर `square`ABCR च्या सर्व कोनांची मापे काढा.
खालील आकृती मध्ये `square`ABCD समांतरभुज चौकोन आहे. किरण AB वर बिंदू E असा आहे की BE = AB. तर सिद्ध करा, की रेषा ED ही रेख BC ला F मध्ये दुभागते.
खालील आकृती मध्ये, बिंदू G हा ΔDEF चा मध्यगा संपात आहे. किरण DG वर बिंदू H असा घ्या, की D-G-H आणि DG = GH, तर सिद्ध करा `square`GEHF समांतरभुज आहे.
खालील आकृती मध्ये `square`ABCD ह्या समांतरभुज चौकोनाच्या बाजूंवर P, Q, R, S बिंदू असे आहेत की, AP = BQ = CR = DS तर सिद्ध करा, की `square`PQRS हा समांतरभुज चौकोन आहे.
समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 3 : 4 आहे जर त्याची परिमिती 112 सेमी असेल तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा.