Advertisements
Advertisements
Question
खालील फरक स्पष्ट करा:
करदेय गोदाम आणि करदत्त गोदाम
Distinguish Between
Solution
करदेय गोदाम | करदत्त गोदाम | |
अर्थ: | करदेय गोदामे ही सरकारकडून परवानाकृत असून आयात मालाचा साठा सीमाशुल्क भरेपर्यंत आयातदाराकडून उपयोगात आणली जातात. | जर एखादया आयातदाराला वस्तूंच्या वाहतुकीत अडचणी येत असतील तर सीमाशुल्क भरल्यानंतर माल करदत्त गोदामांमध्ये ठेवला जाऊ शकतो. |
नियंत्रण: | ही गोदामे सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करतात. | सर्व करदत्त गोदामे ही सार्वजनिक गोदामे आहेत जी आयादारांना उपलब्ध आहेत. |
वर्गीकरण: | आयात माल कराराअंतर्गत (Bonds) ठेवला जातो आणि संमतीशिवाय काढता येत नाहीत. | सर्व गोदामे आयातदारांना उपयुक्त आहेत कारण की मालाची योग्य ती काळजी घेतली जाते व विविध प्रक्रिया (जसे की विभागणी, पुनर्वेष्टन इ. प्रक्रिया केल्या जातात.) |
स्थान: | हे गोदी क्षेत्राजवळ स्थित आहेत आणि जर आयातदार माल आयात झाल्यानंतर ताबडतोब सीमाशुल्क भरण्यास असमर्थ असेल अथवा सीमाशुल्क भरण्यास तयार नसेल तर तो माल बंधपत्र गोदामात ठेवू शकतो. | सदर गोदामे बंदर अथवा गोदी क्षेत्राजवळ प्रकर्षाने आढळतात. |
उपयोग: | आयातदार ज्याप्रमाणात सीमाशुल्क भरतो त्या प्रमाणात गोदामातून माल बाहेर काढू शकतो. | वस्तूंच्या पुनर्निर्यातीसाठी सदर गोदामे अधिक उपयोगी असतात. |
shaalaa.com
व्यवसाय सेवा (Business services) - गोदाम (Warehousing)
Is there an error in this question or solution?