Advertisements
Advertisements
Question
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Solution
दि. १० जून २०१९
प्रति,
मा. व्यवस्थापन,
हिरवाई ट्रस्ट,
बालोद्यान मार्ग,
तळेगाव - दाभाडे.
विषय - अभिनंदन करण्याबाबत.
महोदय,
सध्या जागतिक तापमानात सतत वाढ होत आहे. पर्यावरण असंतुलित आहे. या सर्वांचे दुष्परिणाम जाणवू लागले आहे. यावर उपाय म्हणजे भरपूर झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
या पार्श्वभूमीवर आपली हिरवाई ट्रस्ट "झाडे लावा..... झाडे जगवा" हे आपले ब्रीदवाक्य प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या रोपांचे मोफत वाटप करून लोकांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करत आहे. आपल्या मोफत रोपे वाटप उपक्रमामुळे हजारो लोक ही रोपे घेऊन आपल्या परिसरात लावत आहेत. त्यामुळे उजाड, भकास परिसर हिरवंगार होत आहे.
आपला हा मोफत रोप वाटपाचा उपक्रम अभिनंदनास पात्र आहे. आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षकांच्या वतीने आपले मन:पूर्वक अभिनंदन. धन्यवाद.
आपला विश्वासू ,
अ. ब. क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
चिकित्सक हायस्कुल,
खाडिलकर रोड,
गिरगाव मुंबई.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.
पत्रलेखन: खालील निवेदन वाचा व कृती सोडवा
पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
![]() |
“आरोग्यम् धनसंपदा” टिळक स्पोर्ट्स ४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३० |
![]() |
||
सेल | सेल | सेल | ||
खेळ सात दिवस चालू |
आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच. आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते. भरपूर स्टॉक! वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत |
![]() |
||
अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने | ||||
वरील जाहिरातीवरून आपल्या क्लबला क्रीडा-साहित्य पुरवण्यासाठी पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता. संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय, अहमदनगर. E-mail - janatavidya02@gmail.com मोबाइल - 0211556680 |
अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्यखालील कृती सोडवा.
जागरूक नागरिक या नात्याने 'फॅन्टसी लँड' या उद्यानासमोरील रस्त्यावरील नादुरुस्त सिग्नल दुरुस्त केल्याबद्दल मा. वाहतूक अधिकारी यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
विद्यार्थी या नात्याने स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
'झाडे लावा........ झाडे जगवा. ' हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे hirwaitrust04@gmail.com |
कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.