Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
उत्तर
दि. १० जून २०१९
प्रति,
मा. व्यवस्थापन,
हिरवाई ट्रस्ट,
बालोद्यान मार्ग,
तळेगाव - दाभाडे.
विषय - अभिनंदन करण्याबाबत.
महोदय,
सध्या जागतिक तापमानात सतत वाढ होत आहे. पर्यावरण असंतुलित आहे. या सर्वांचे दुष्परिणाम जाणवू लागले आहे. यावर उपाय म्हणजे भरपूर झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
या पार्श्वभूमीवर आपली हिरवाई ट्रस्ट "झाडे लावा..... झाडे जगवा" हे आपले ब्रीदवाक्य प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या रोपांचे मोफत वाटप करून लोकांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करत आहे. आपल्या मोफत रोपे वाटप उपक्रमामुळे हजारो लोक ही रोपे घेऊन आपल्या परिसरात लावत आहेत. त्यामुळे उजाड, भकास परिसर हिरवंगार होत आहे.
आपला हा मोफत रोप वाटपाचा उपक्रम अभिनंदनास पात्र आहे. आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षकांच्या वतीने आपले मन:पूर्वक अभिनंदन. धन्यवाद.
आपला विश्वासू ,
अ. ब. क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
चिकित्सक हायस्कुल,
खाडिलकर रोड,
गिरगाव मुंबई.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जीवनज्योती विद्यालय, नांदगाव प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू संपर्क – [email protected] दीपक/दीपाली माने |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी सुहास/सुनीता देसाई, यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती. शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित ‘एकपाती अभिनय स्पर्धा’ दि. 3 जानेवारी स. 11 वा. [email protected] - मुख्याध्यापक |
अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती/सुयश देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
आदर्श विद्यालय बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं ![]() |
|
स्पर्धेचे ठिकाण आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा दि. 14 नोव्हेंबर |
वेळ - सकाळी 9.00 ते 11.00 - मुख्याध्यापक |
विद्यार्थी प्रमुख या नात्याने तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
आदर्श विद्यालय बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं ![]() |
|
स्पर्धेचे ठिकाण आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा दि. 14 नोव्हेंबर |
वेळ - सकाळी 9.00 ते 11.00 - मुख्याध्यापक |
विद्यार्थी प्रमुख या नात्याने स्पर्धेत इ. 10वीं - अ या वर्गातील वीस विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मा. मुख्याध्यापकांना लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी आयोजित |
||
स्पर्धा - दि. 20 मार्च | वेळ - स. 9 वाजता | |
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी. E-mail - [email protected] |
||
विनय/विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
||
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला/मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
'झाडे लावा........ झाडे जगवा. ' हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे [email protected] |
कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.