Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.
उत्तर
दिनांक: ४ जून २०१९
प्रति,
माननीय संचालक
हिरवाई ट्रस्ट,
बालोद्यान मार्ग,
तळेगाव दाभाडे.
विषय: 'वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत.'
माननीय महोदय,
मी अ.ब.क, स्वामी दयानंद शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणांस हे पत्र लिहीत आहे. 'जागतिक पर्यावरण दिनानिमित्त' दिनांक ५ जून २०१९ रोजी हिरवाई ट्रस्ट 'झाडे लावा ... झाडे जगवा' हा उपक्रम राबवणार असल्याचे कळले. या उपक्रमात औषधी वनस्पतींच्या, फुलांच्या, फळांच्या रोपांचे मोफत वाटप होणार आहे. आमच्या स्वामी दयानंद शाळेच्या मोकळ्या मैदानात व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्याची आमची इच्छा आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आम्हांला खारीचा वाटा उचलायचा आहे.
आमच्या विनंतीला मान देऊन आपण आम्हांस या स्तुत्य उपक्रमात सहभागी करून घ्याल, अशी आशा वाटते. त्याकरता आपण ही रोपे लवकरात लवकर शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावीत ही नम्र विनंती.
- छायादार वृक्षाचे रोपे - 15
- फळझाडांची रोपे - 10
- औषधी वनस्पतींची रोपे - 20
- फुलझाडांची रोपे - 20
कळावे,
आपली विश्वासू,
अ.ब.क.
विद्यार्थी प्रतिनिधी
स्वामी दयानंद शाळा,
पेशवे रोड,
पुणे.
[email protected]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
आदर्श विद्यालय बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं ![]() |
|
स्पर्धेचे ठिकाण आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा दि. 14 नोव्हेंबर |
वेळ - सकाळी 9.00 ते 11.00 - मुख्याध्यापक |
विद्यार्थी प्रमुख या नात्याने तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
आदर्श विद्यालय बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं ![]() |
|
स्पर्धेचे ठिकाण आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा दि. 14 नोव्हेंबर |
वेळ - सकाळी 9.00 ते 11.00 - मुख्याध्यापक |
विद्यार्थी प्रमुख या नात्याने स्पर्धेत इ. 10वीं - अ या वर्गातील वीस विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मा. मुख्याध्यापकांना लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
वाचाल तर वाचाल! मनोज पुस्तकालय 69/314 आनंद नगर, अकोला दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत |
|
कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत |
2000 रुपयांच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत |
वेळ `↓` स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता सोमवार बंद. संपर्क - [email protected] |
|
श्रेया/श्रेयस इनामदार | |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा. |
वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्यखालील कृती सोडवा.
जागरूक नागरिक या नात्याने 'फॅन्टसी लँड' या उद्यानासमोरील रस्त्यावरील नादुरुस्त सिग्नल दुरुस्त केल्याबद्दल मा. वाहतूक अधिकारी यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.
संबंधित विषयासाठी स्व-परिचय पत्र तयार करा.
स्वपरिचय पत्राचे मुद्दे
(१) संपूर्ण नाव
(२) पत्ता
(३) संपर्क क्रमांक
(४) जन्मतारीख
(५) उंची, वजन
(६) शैक्षणिक पात्रता
(७) इतर आवडणारे खेळ
(८) पूर्वी प्राप्त केलेले यश
'झाडे लावा........ झाडे जगवा. ' हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे [email protected] |
कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्य खरेदीवर विशेष सवलत दिल्या- बद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.