Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.
उत्तर
दिनांक: ४ जून २०१९
प्रति,
माननीय संचालक
हिरवाई ट्रस्ट,
बालोद्यान मार्ग,
तळेगाव दाभाडे.
विषय: 'वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत.'
माननीय महोदय,
मी अ.ब.क, स्वामी दयानंद शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणांस हे पत्र लिहीत आहे. 'जागतिक पर्यावरण दिनानिमित्त' दिनांक ५ जून २०१९ रोजी हिरवाई ट्रस्ट 'झाडे लावा ... झाडे जगवा' हा उपक्रम राबवणार असल्याचे कळले. या उपक्रमात औषधी वनस्पतींच्या, फुलांच्या, फळांच्या रोपांचे मोफत वाटप होणार आहे. आमच्या स्वामी दयानंद शाळेच्या मोकळ्या मैदानात व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्याची आमची इच्छा आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आम्हांला खारीचा वाटा उचलायचा आहे.
आमच्या विनंतीला मान देऊन आपण आम्हांस या स्तुत्य उपक्रमात सहभागी करून घ्याल, अशी आशा वाटते. त्याकरता आपण ही रोपे लवकरात लवकर शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावीत ही नम्र विनंती.
- छायादार वृक्षाचे रोपे - 15
- फळझाडांची रोपे - 10
- औषधी वनस्पतींची रोपे - 20
- फुलझाडांची रोपे - 20
कळावे,
आपली विश्वासू,
अ.ब.क.
विद्यार्थी प्रतिनिधी
स्वामी दयानंद शाळा,
पेशवे रोड,
पुणे.
[email protected]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.
पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती. शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित ‘एकपाती अभिनय स्पर्धा’ दि. 3 जानेवारी, स. 11 वा. [email protected] - मुख्याध्यापक |
अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
आदर्श विद्यालय बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं ![]() |
|
स्पर्धेचे ठिकाण आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा दि. 14 नोव्हेंबर |
वेळ - सकाळी 9.00 ते 11.00 - मुख्याध्यापक |
विद्यार्थी प्रमुख या नात्याने तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी आयोजित |
||
स्पर्धा - दि. 20 मार्च | वेळ - स. 9 वाजता | |
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी. E-mail - [email protected] |
||
विनय/विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
||
विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
‘स्वच्छता हीच देशसेवा’ स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता शालेय परिसर स्वच्छता |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
स्थळ गोखले नाट्यगृह, |
रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक नाट्य स्पर्धा दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८ वेळ - रात्री: ९:३० ते १२:३० प्रवेश - फक्त पासधारक* नियम व अटी लागू. |
नावनोंदणी |
तुमच्या नाटकासाठी | ||
वरील स्पर्धेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पत्र लिहा. |
रक्तदान शिबिरात नागरिक या नात्याने तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहायचे आहे. त्यासाठी खालील निवेदन वाचा व त्याआधारे पत्राच्या प्रारूपात केवळ मुद्दे योग्य ठिकाणी लिहा.
संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.