Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
उत्तर
दि. १० जून २०१९
प्रति,
मा. व्यवस्थापन,
हिरवाई ट्रस्ट,
बालोद्यान मार्ग,
तळेगाव - दाभाडे.
विषय - अभिनंदन करण्याबाबत.
महोदय,
सध्या जागतिक तापमानात सतत वाढ होत आहे. पर्यावरण असंतुलित आहे. या सर्वांचे दुष्परिणाम जाणवू लागले आहे. यावर उपाय म्हणजे भरपूर झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
या पार्श्वभूमीवर आपली हिरवाई ट्रस्ट "झाडे लावा..... झाडे जगवा" हे आपले ब्रीदवाक्य प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या रोपांचे मोफत वाटप करून लोकांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करत आहे. आपल्या मोफत रोपे वाटप उपक्रमामुळे हजारो लोक ही रोपे घेऊन आपल्या परिसरात लावत आहेत. त्यामुळे उजाड, भकास परिसर हिरवंगार होत आहे.
आपला हा मोफत रोप वाटपाचा उपक्रम अभिनंदनास पात्र आहे. आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षकांच्या वतीने आपले मन:पूर्वक अभिनंदन. धन्यवाद.
आपला विश्वासू ,
अ. ब. क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
चिकित्सक हायस्कुल,
खाडिलकर रोड,
गिरगाव मुंबई.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.
पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती. शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित ‘एकपाती अभिनय स्पर्धा’ दि. 3 जानेवारी, स. 11 वा. [email protected] - मुख्याध्यापक |
अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती. शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित ‘एकपाती अभिनय स्पर्धा’ दि. 3 जानेवारी स. 11 वा. [email protected] - मुख्याध्यापक |
अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती/सुयश देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
‘स्वच्छता हीच देशसेवा’ स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता शालेय परिसर स्वच्छता |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
स्थळ गोखले नाट्यगृह, |
रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक नाट्य स्पर्धा दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८ वेळ - रात्री: ९:३० ते १२:३० प्रवेश - फक्त पासधारक* नियम व अटी लागू. |
नावनोंदणी |
तुमच्या नाटकासाठी | ||
वरील स्पर्धेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता. संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय, अहमदनगर. E-mail - [email protected] मोबाइल - 0211556680 |
अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा. |
रक्तदान शिबिरात नागरिक या नात्याने तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहायचे आहे. त्यासाठी खालील निवेदन वाचा व त्याआधारे पत्राच्या प्रारूपात केवळ मुद्दे योग्य ठिकाणी लिहा.
शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने साफल्य बुक डेपोकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.