हिंदी

पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.

दीर्घउत्तर

उत्तर

विनंती पत्र – (औपचारिक)

दिनांक: ६ जानेवारी २०२१

प्रति,

श्री. विनोद कुमरे सर

माननीय पोलीस अधिकारी,

पोलीस स्टेशन, कारंजा

ता. कारंजा, जि. नागपूर ४०००१७

विषय: 'किशोरवयीन विद्यार्थ्यांकरता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्याची विनंती करण्याबाबत.'

माननीय महोदय,

मी कारंजा येथील विकास विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. कालच वर्तमानपत्रातील आपल्या अभिनव उपक्रमाविषयीची जाहिरात वाचनात आली. महिला सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेले, 'महिला सुरक्षा स्वतंत्र ॲप' हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.

आजच्या घडीचा विचार करता महिलांना आणि किशोरवयीन मुलांना अनेक संकटांशी सामना करावा लागतो. अशावेळी स्वसंरक्षणासाठी त्यांनी सज्ज असणे आवश्यक ठरते. यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.

याचा विचार करूनच आमच्या शाळेने 'स्वसंरक्षण शिबीर' आयोजित केले आहे. या शिबिरात आपण किशोरवयीन विद्यार्थ्यांना सुरक्षाविषयक मार्गदर्शन करावे अशी मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने विनंती करत आहे.

कृपया, यासंबंधीचा आपला विचार आपण लवकरात लवकर कळवावा ही विनंती.

कळावे,

आपली कृपाभिलाषी,

स्नेहल

विकास विद्यालय,

राजवीर नगर, ता. कारंजा,

जि. नागपूर ४०००१७

[email protected]

किंवा

अभिनंदन पत्र – (औपचारिक)

दिनांक: ११ जानेवारी २०२१

प्रति,

माननीय श्री. रमाकांत जाधव

पोलीस स्टेशन प्रभारी,

पोलीस स्टेशन कारंजा,

ता. कारंजा,

जि. नागपूर ४०००६१

विषय: कारंजा पोलीस स्टेशन येथील कार्यरत बांधवांचे अभिनंदन करण्याबाबत.

महोदय,

मी स्नेहल कारंजा येथील विकास विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. मागच्या आठवड्यात आमच्या शाळेत राबवलेल्या संरक्षण शिबिरामध्ये आपल्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत बांधवांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या अभिनव उपक्रमाविषयी आम्हां विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल आपणां सर्व पोलीस बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन.

महिला सुरक्षेची गरज लक्षात घेता महिलांना निर्भयपणे जगण्याचे स्वातंत्र्य मिळावे याकरता राबवलेला हा अभिनव उपक्रम खरोखरच महिला सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 'महिला सुरक्षा स्वतंत्र ॲप' द्वारे महिला कोणत्याही संकटात असताना पोलिसांशी तत्काळ संपर्क साधू शकतात व पोलीस यंत्रणाही तत्काळ उपस्थित राहून महिलांना सुरक्षा प्रदान करू शकते. त्यामुळे, महिलांना मोकळे पणाने जगता येणे शक्य होईल अशी खात्री या उपक्रमातून मिळते.

या अभिनव उपक्रमाबाबत विकास विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने संपूर्ण विद्यालयाच्या वतीने मी आपल्या पोलीस बांधवांचे अभिनंदन करते.

आपली विश्वासू,

स्नेहल 

विकास विद्यालय,

राजवीर नगर, ता. कारंजा,

जि. नागपूर ४०००१६

shefytre242gail.com

shaalaa.com
पत्रलेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20.3: उपयोजित लेखन - पत्रलेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
अध्याय 20.3 उपयोजित लेखन
पत्रलेखन | Q अ. ४.
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi (Second Language) 10 Standard SSC
अध्याय 16.3 उपयोजित लेखन
स्वाध्याय | Q अ. ४.

संबंधित प्रश्न

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.


1. पत्रलेखन:

पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.


पत्रलेखन: खालील निवेदन वाचा व कृती सोडवा


पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती.
शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित
‘एकपाती अभिनय स्पर्धा’
दि. 3 जानेवारी, स. 11 वा.
[email protected]
               - मुख्याध्यापक

अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

संत गाडगेबाबा विद्यालय,
संतभूमी चौक, अमरावती.
शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’
तर्फे आयोजित
‘एकपाती अभिनय स्पर्धा’
दि. 3 जानेवारी  स. 11 वा.
[email protected]
               - मुख्याध्यापक

अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती/सुयश देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

आदर्श विद्यालय
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित
गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं
गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं
स्पर्धेचे ठिकाण
आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
दि. 14 नोव्हेंबर

वेळ - सकाळी 9.00 ते 11.00
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा

- मुख्याध्यापक

विद्यार्थी प्रमुख या नात्याने तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी
आयोजित
स्पर्धा - दि. 20 मार्च वेळ - स. 9 वाजता
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

पारितोषिक वितरण सोहळा
प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे
अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन
स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी
संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी.
E-mail - [email protected]
विनय/विनया देशमुख
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला/मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

‘स्वच्छता हीच देशसेवा’

स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम

दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता

शालेय परिसर स्वच्छता

विद्यार्थी प्रतिनिधी
या नात्याने
स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!

  • दिनांक: ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८
  • वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • सूचना: शाळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
सहल प्रमुख या नात्याने
 तुमच्या शाळेला परवानगी मिळण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!

  • दिनांक: ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८
  • वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • सूचना: शाळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
सहल प्रमुख या नात्याने
तुमच्या मित्रास वस्तुसंग्रहालय पाहण्यास येण्यासाठी पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

स्थळ

गोखले नाट्यगृह,
मिरज

रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त

ऐतिहासिक नाट्य स्पर्धा

दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८

वेळ - रात्री: ९:३० ते १२:३०

प्रवेश - फक्त पासधारक*

नियम व अटी लागू.

नावनोंदणी
आवश्यक

तुमच्या नाटकासाठी
तुमच्या मित्राला तुमचे नाटक पाहण्यास येण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जनता विद्यालय

अहमदनगर

आयोजित

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता.

संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय,

अहमदनगर.

E-mail - [email protected]

मोबाइल - 0211556680

अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

वाचाल तर वाचाल!

मनोज पुस्तकालय

69/314 आनंद नगर, अकोला

दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त

दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत

कोणत्याही पुस्तकावर
20% सवलत
2000 रुपयांच्या खरेदीवर
एक पुस्तक मोफत
वेळ
`↓`
स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता
सोमवार बंद.
संपर्क - [email protected]
श्रेया/श्रेयस इनामदार
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

वाचाल तर वाचाल!

मनोज पुस्तकालय

69/314 आनंद नगर, अकोला

दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त

दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत

कोणत्याही पुस्तकावर
20% सवलत
2000 रुपयांच्या खरेदीवर
एक पुस्तक मोफत
वेळ
`↓`
स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता
सोमवार बंद.
संपर्क - [email protected]
श्रेया/श्रेयस इनामदार
संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र/मैत्रिणीला लिहा.

रक्तदान शिबिरात नागरिक या नात्याने तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहायचे आहे. त्यासाठी खालील निवेदन वाचा व त्याआधारे पत्राच्या प्रारूपात केवळ मुद्दे योग्य ठिकाणी लिहा.


वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने 'फॅन्टसी लँड' या उद्यानासमोरील रस्त्यावर नवीन सिग्नलं यंत्रणा बसवून देण्याची मागणी करणारे पत्र मा. वाहतूक अधिकारी यांना लिहा.


वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्यखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने 'फॅन्टसी लँड' या उद्यानासमोरील रस्त्यावरील नादुरुस्त सिग्नल दुरुस्त केल्याबद्दल मा. वाहतूक अधिकारी यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने साफल्य बुक डेपोकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.


संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा. 


तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष आढळल्या, याविषयी तक्रार करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.


कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदीची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.


'झाडे लावा........ झाडे जगवा. '

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.


'झाडे लावा........ झाडे जगवा. '

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.


योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्य खरेदीवर विशेष सवलत दिल्या- बद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×