English

किरण PQ आणि किरण PR परस्परांशी लंब आहेत. बिंदू B हा ∠QPR च्या आंतरभागात व बिंदू A हा ∠RPQ च्या बाह्यभागात आहे. किरण PB आणि किरण PA परस्परांना लंब आहेत. यावरून - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

किरण PQ आणि किरण PR परस्परांशी लंब आहेत. बिंदू B हा ∠QPR च्या आंतरभागात व बिंदू A हा ∠RPQ च्या बाह्यभागात आहे. किरण PB आणि किरण PA परस्परांना लंब आहेत. यावरून आकृती काढा व खालील कोनांच्या जोड्या लिहा.

  1. कोटिकोन
  2. पूरक कोन
  3. एकरूप कोन
Sum

Solution

किरण PQ ⊥ PR, त्यामुळे m∠QPR = 90° आहे आणि किरण PA ⊥ किरण PB, त्यामुळे m∠APB = 90° आहे.

(i) ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असते, त्यांना कोटिकोन म्हणतात.

m∠QPR = 90

⇒ m∠BPQ + m∠BPR = 90

∴ ∠BPQ आणि ∠BPR हे कोटिकोन आहेत.

(ii) ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते, त्यांना पूरक कोन म्हणतात.

⇒ m∠APB + m∠QPR 

= 90 + 90 

= 180

∴ ∠APB आणि ∠QPR हे पूरक कोन आहेत.

(iii) समान माप असलेल्या कोनांना एकरूप कोन म्हणतात.

m∠QPR = m∠APB = 90

∴ ∠APB आणि ∠QPR हे एकरूप कोन आहेत.

shaalaa.com
समांतर रेषांच्या गुणधर्मांचा उपयोग
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: समांतर रेषा - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [Page 22]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2 समांतर रेषा
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 2. | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×