Advertisements
Advertisements
Question
कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.
Answer in Brief
Solution
- १९९८ मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. सुमारे ७६० किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या चार राज्यांत पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत.
- या मार्गावर एकूण ९२ बोगदे आहेत. या मार्गावरील कारबुडे येथील ६.५ किमी लांबीचा बोगदा सर्वांत मोठा बोगदा आहे.
- १७९ मोठे आणि १८१९ छोटे पूल या मार्गावर आहेत. त्यांपैकी होनावरजवळील शरावती नदीवरील २०६५.८ मीटर लांबीचा पूल सर्वांत मोठा आहे.
- रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील ६४ मीटर उंचीचा पूल सर्वांत उंच पूल आहे.
- दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.
shaalaa.com
तंत्रज्ञानातील प्रगती
Is there an error in this question or solution?