Advertisements
Advertisements
Question
‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
Solution
पतिनिधनामुळे स्वाती आधीच दुःखाच्या खाईत लोटल्या गेल्या होत्या. जीवनाचा साथीदार सोबत असला तर माणसे वाट्टेल ती दुःखे सहन करू शकतात. वाटेल त्या संकटांना सामोरे जाण्याची मानसिक हिम्मत माणसांमध्ये असते. इथे तर स्वातींचा पती अर्ध्या वाटेवरूनच या जीवनातून निघून गेला होता त्यातच दोन मुलांना वाढवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच येऊन पडली होती, दुसरी एक गोष्ट स्वातींच्या मार्गात आडवी येणारी होती, ऐन तारुण्यात माणसामध्ये प्रचंड ऊर्जा असते. कोणतेही धाडसी काम करण्यास तरुण मन मागे पुढे पाहत नाही, आणि आता स्वाती तर वयाच्या चाळिशीत पोहोचल्या होत्या. या वयात धडाकेबाज कृती करण्यास लागणारे शारीरिक-मानसिक बळ कमी असण्याचा संभव असतो. तसेच, त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. तेथील जीवन तर आत्यंतिक खडतर होते. तेथे कमालीची शारीरिक क्षमता आवश्यक असते. आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ अधिक गरजेचे असते.
या अडचणी दूर करण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागणार होते. परंतु कोणत्याही परिस्थितीत सैन्यात जायचेच, असा स्वाती यांचा पक्का निर्धार होता. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट घेण्याची मानसिक तयारी त्यांनी केलेली होती. तसे कष्ट त्यांनी घेतलेसुद्धा, म्हणूनच त्यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.
‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.
पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
'पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं', स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
टिपा लिहा.
मुले भरकटण्याची कारणे
‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.