Advertisements
Advertisements
Question
'कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
Solution
नारायण सुर्वे यांच्या 'दोन दिवस' या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करताना 'भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली', या शब्दांत कवीने भीषण जीवनसत्य मांडले आहे.
रोजची भूक भागवण्यासाठीही जिथे अपार कष्ट करावे लागतात, या पोटामागे संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते अशा कष्टकऱ्यांचे जीवन खूपदा सुखाची वाट पाहण्यात वाया जाते किंवा दु:खांशी झुंज देण्यात, अडचणींचा सामना करण्यातच निघून जाते. त्यांचे आयुष्य रणरणत्या उन्हाळ्याचे असते. पोटाची आग शांत करण्यासाठी त्यांना भाकरीच्या चंद्राची वाट पाहावी लागते, तिचा शोध घ्यावा लागतो. अशा कष्टकर्यांच्या जीवनातील व्यथा, वेदना मांडून कवीने जीवनसत्याचे दर्शन घडवले आहे. दु:खमय परिस्थितीतही सकारात्मक विचार करत आयुष्य जगणाऱ्या कामगाराचे चित्रण यात घडते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील ओळींचे रसग्रहण करा.
दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.
कृती पूर्ण करा.
कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’
कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात -
खालील ओळींचे रसग्रहण करा.
दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो.
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा. (2)
- दारिद्र्याकडे गहाण पडलेले - ______
- कवीचा जवळचा मित्र - ______
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- फुलले -
- धुंद -
- झोतभट्टी -
- पोलाद -
४. काव्यसौंदर्य: (2)
‘हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’, या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.
मुद्दे | ‘दोन दिवस’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘झोतभट्टीत शेकावे पोलाद। तसे आयुष्य छान शेकले।।’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) वाळविले - |
(ii) पेलावे - | |
(iii) हरघडी - | |
(iv) अगा - |
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा. (2)
- दोन दिवस वाट पाहण्यात गेले; तर दोन गेले - ______
- भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी झाली - ______
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- गहाण -
- डोईवर -
- झेतभट्टी -
- धुंद -
४. काव्या सौंदर्य: (2)
“दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलों”
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. एका शब्दात उत्तर लिहा. (2)
- कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट -
- कवीचा जवळचा मित्र -
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. |
2. कृती पूर्ण करा. (2)
- कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
- 'दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात', या शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
3. पुढील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
शब्द | अर्थ | |
1. | दारिद्र्य | ______ |
2. | हरघडी | ______ |
3. | साहाय्य | ______ |
4. | दुनिया | ______ |
4. 'कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. (2)