Advertisements
Advertisements
Question
लेखकाचा बार्कमधील अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
लेखकाचे कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर ते बार्क म्हणजेच 'भाभा अणुसंशोधन केंद्राच्या' ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. तेथे असताना त्यांना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्ती देणारे होते. 'आपण काय काम करायचं ते आपणच ठरवलं पाहिजे आणि आपलं काम आपणच निर्माण केलं पाहिजे' हा अतिशय महत्त्वाचा व प्रेरणादायी विचार डॉ. भाभांनी डॉ. काकोडकरांच्या मनात रुजवला. हे प्रशिक्षण संपल्यावर लेखक बार्कमध्येच इंजिनिअर म्हणून रुजू झाले.
लेखकाने त्यांनी दिलेल्या या सूचनांचे तंतोतंत पालन केले आणि त्यानंतर आपले काम आपणच शोधल्यास 'स्काय इज द लिमिट' अशी परिस्थिती खरोखरच निर्माण होत असल्याचा अनुभव घेतला.
बार्कमध्ये इंजिनियर म्हणून रुजू होताच लेखक डॉ. अनिल काकोडकर यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यास सांगण्यात आले; त्याकरता आवश्यक यंत्रसामग्रीही तेथे उपलब्ध होती; मात्र आतापर्यंत त्यावर कोणीही काम केलेले नसतानाही लेखकांनी ते काम हाती घेतले व मदतीसाठी एक वेल्डर व एक फोरमन यांची मागणी वरिष्ठांकडे केली; पण त्याला नकार मिळताच लेखकांनी स्वत: कामास सुरुवात केली आणि धडपड करत त्यांनी ते काम पूर्णही केले. त्यानंतर वरिष्ठांनी कार्यक्रमाची व्याप्ती वाढवायला सुरुवात केली आणि मग मात्र सारी मदत पुरवण्याची तयारी दर्शवली; मात्र ही मदत लेखकांनी नाकारली. आतापर्यंत इतरांकडून काम न होण्यामागील कारण वरिष्ठांकडून कळताच मात्र 'आधी तुम्ही करू शकता हे दाखवा, मग इतरांना काम सांगा' या विचाराची लेखकास प्रचिती आली. अशाप्रकारे, लेखक बार्कमधील अनुभवांनी अधिक प्रगल्भ झाले.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
टिपा लिहा.
बार्क
टिपा लिहा.
डॉ. होमी भाभा
'स्काय इस द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.
मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?
‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिमाणकारक असते,' हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो...’ या पाठाधारे स्पष्ट करा.
डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा.
डॉक्टर होमी भाभा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
वैज्ञानिक व विद्यार्थी यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
- टीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
- 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
- 'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॉक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.