Advertisements
Advertisements
Question
‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिमाणकारक असते,' हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो...’ या पाठाधारे स्पष्ट करा.
Solution
सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी “मोठे होत असलेल्या मुलांनो...' या पाठात बार्कमधील आपले अनुभव कथन केले आहेत.
लेखक जेव्हा बार्कमधील ट्रेनिंग संपवून इंजिनियर म्हणून बार्कमध्ये रुजू झाले, तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर त्यांना काम करायला सांगण्यात आले. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री तिथे होती पण आतापर्यंत ती कोणीही वापरली नव्हती. मेटलायझिंग प्रकियेवर काम करण्यास लेखक तयार झाले होते. मात्र त्यांनी त्या कामासाठी एक वेल्डर व एक फोरमन यांची मागणी केली होती. ती त्यांची मागणी नाकारण्यात आली. त्यांना स्वत:लाच ते सर्व करावे लागेल असेही सांगण्यात आले.
वरिष्ठांची आज्ञा म्हणून लेखकाने सुरुवात केली व स्वप्रयत्नाने ते काम पूर्ण केले. मग वरिष्ठांकडून कामाची व्याप्ती वाढविण्यात आली. त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास संस्था तयार झाली. त्यावेळेस वरिष्ठांनी त्यांना सांगितले की, तुम्ही हे काम करू शकता याचा विश्वास इतरांना वाटल्यावर मग त्यासाठी मदत मागणे हे योग्य. तुम्ही स्वत:ला सिद्ध करणे महत्त्वाचे असते. आधीच मागण्या करण्याची लोकांची वृत्ती असते. त्यामुळेच मेटलायझिंग प्रक्रियेवर काम अजिबात झालेले नव्हते. काम आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना ते काम सांगणे योग्य नाही. प्रत्यक्ष अनुभवातून शिकल्याने कार्यकुशलता व सर्जनशीलता वाढते.
अशाप्रकारे 'प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे परिणामकारक असते”, याची सत्यता पटते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
टिपा लिहा.
बार्क
टिपा लिहा.
डॉ. होमी भाभा
'स्काय इस द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.
मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?
‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा.
लेखकाचा बार्कमधील अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
डॉक्टर होमी भाभा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
वैज्ञानिक व विद्यार्थी यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
- टीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
- 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
- 'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॉक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.