English

मागणीचे कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

मागणीचे कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

अर्थशास्‍त्रीयदृष्‍ट्या मागणी म्‍हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्‍तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. अशा इच्छेचे रूपांतर मागणीत होते.

मागणीचे प्रकार खालील प्रमाणे आहेत:

  1. प्रत्‍यक्ष मागणी: प्रत्‍यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्‍यांकडून ज्‍या वस्‍तूंना मागणी केली जाते, त्‍याला प्रत्‍यक्ष मागणी असे म्‍हणतात. या वस्‍तू उपभोक्‍त्‍यांच्या गरजा प्रत्‍यक्ष भागवितात. अशा प्रकारच्या उपभोग्‍य वस्‍तूंना मागणी केली जाते. उदा., अन्नाची मागणी, कपडे इत्‍यादी.
  2. अप्रत्‍यक्ष मागणी: अप्रत्‍यक्ष मागणीला परोक्ष मागणी असेही म्‍हणतात. या वस्‍तूंची मागणी वस्‍तूंच्या उत्‍पादनासाठी आवश्यक असते. ही मागणी उत्‍पादनाच्या वस्‍तूंची असते. अशा प्रकारे उत्‍पादन घटकांची मागणी अप्रत्‍यक्ष मागणी असते. उदा., साखर कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्‍यक्ष मागणी असते.
  3. पूरक मागणी: जेव्हा एखाद्या वस्‍तूची मागणी इतर कोणत्‍याही वस्‍तूबरोबर केली जाते, तेव्हा त्‍यास पूरक मागणी असे म्‍हणतात. पूरक मागणीलाच संयुक्‍त मागणी असेही म्‍हणतात. विशिष्‍ट गरज पूर्ण करण्यासाठी दोन किंवा अधिक वस्‍तूंची एकत्रित मागणी केली जाते, तेव्हा ती अस्तित्‍वात येते. उदा., शाईपेन आणि शाईची मागणी, कार आणि इंधनाची मागणी इत्‍यादी.
  4. संमिश्र मागणी: एका वस्‍तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते, तेव्हा त्‍यास संमिश्र मागणी असे म्‍हणतात. उदा., विजेची मागणी. याची मागणी वेगवेगळ्या उपयोगांसाठी जसे, विद्युत दिवे, पंखा, धुलाईयंत्र इत्‍यादींसाठी केली जाते.
  5. स्‍पर्धात्‍मक मागणी: ही अशा वस्‍तूंची मागणी असते, जी एकमेकांना पर्याय असतात. उदा., चहा आणि कॉफी, साखर आणि गूळ इत्‍यादी.
shaalaa.com
मागणीचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×