English

भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही चार समस्या स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही चार समस्या स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

भांडवल बाजार हा देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधींची बाजारपेठ आहे. हा वित्‍तीय प्रणालीचा एक महत्‍त्‍वाचा घटक आहे.

भारतीय भांडवल बाजारात खालीलप्रमाणे समस्‍या आढळून येतात:

  1. वित्‍तीय घोटाळे: वाढत्‍या आर्थिक घोटाळ्यांचा परिणाम म्‍हणजे भांडवल बाजारातील न भरून येणारा तोटा. यामुळे सार्वजनिक अविश्वासदेखील वाढला आहे आणि वैयक्‍तिक गुंतवणुकीबाबतचा आत्‍मविश्वास कमी झाला आहे.
  2. अंतस्‍थ माहीतगार आणि किंमत गैरफेरफार: अंतस्‍थ माहीतगार म्‍हणजे कंपनीची गुप्त माहिती असल्‍याने एखाद्याला वैयक्‍तिक लाभासाठी अप्रकाशित माहितीची खरेदी-विक्री करणे. गैरप्रकारे केलेली किंमत हाताळणी म्‍हणजे स्‍वतःच्या फायद्यासाठी काही व्यक्‍तींच्या मदतीने खरेदी-विक्री करून भागाच्या किमती वाढवणे. अशा बेकायदेशीर पद्धतीचा भांडवल बाजाराच्या सुगम कार्यावरही परिणाम झाला आहे.
  3. कर्जाची अपुरी साधने: कर्जाच्या साधनांमध्ये रोखे, कर्जरोखे इत्‍यादींचा समावेश होतो. गुंतवणुकींचे कमी प्रमाण, देयकाची जास्‍त किंमत, लघू व मध्यम उद्योगांना प्रवेश नसल्‍यामुळे कर्जाच्या सुरक्षिततेमध्ये जास्‍त व्यापार होत नाही.
  4. व्यापाराच्या प्रमाणातील घट: गुंतवणूकदारांना ऑनलाइन व्यवहाराची उपलब्‍धता व प्राधान्य असल्‍यामुळे प्रादेशिक शेअर बाजारामध्ये व्यापाराच्या प्रमाणात तीव्र घट झाली. कारण गुंतवणूकदार बॉम्‍बे वायदे बाजार व नॅशनल वायदे बाजार या भाग बाजारातील रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
  5. माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव: एखाद्या कंपनीच्या शेअर बाजारातील किमतींनी सध्याच्या किमतीमध्ये सर्व उपलब्‍ध माहिती समाविष्‍ट केली तर बाजार माहितीनुसार कार्यक्षम असल्‍याचे म्‍हटले जाते. तथापि प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील शेअर बाजारात माहितीची कार्यक्षमता कमी आहे.
shaalaa.com
भारतातील भांडवली बाजार
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×