English

उपयोगितेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

उपयोगितेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

उपयोगितेची वैशिष्‍ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  1. सापेक्ष संकल्‍पना: उपयोगिता ही स्‍थल व कालसापेक्ष संकल्‍पना आहे. ती स्‍थलपरत्‍वे व कालपरत्‍वे बदलत जाते. उदा., हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांमध्ये जास्‍त उपयोगिता जाणवते. समुद्रकाठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्‍त उपयोगिता जाणवते.
  2. व्यक्‍तिनिष्‍ठ संकल्‍पना: उपयोगिता ही मानसशास्‍त्रीय संकल्‍पना आहे. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते. याचे कारण आवडी-निवडी, प्राधान्य, स्‍वभाव, पसंती, व्यवसाय इत्‍यादींमध्ये फरक असतो. उदा., डॉक्‍टरला स्‍टेथोस्‍कोपमध्ये उपयोगिता जाणवते; परंतु सर्वसामान्य व्यक्‍तीला जाणवत नाही.
  3. नैतिकदृष्‍ट्या तटस्‍थ: उपयोगितेच्या संकल्‍पनेत नैतिकतेचा विचार नसतो. ही संकल्‍पना नैतिकदृष्‍ट्या तटस्‍थ असते. वस्‍तूने चांगले-वाईट, योग्‍य-अयोग्‍य, असा कोणताही विचार न करता व्यक्‍तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी. उदा., सुरी किंवा चाकूचा वापर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून केला जातो. तर या वस्‍तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठीही केला जातो. दोन्ही गरजा वेगळ्या आहेत. परंतु एकाच वस्‍तूचा वापर करून त्‍या भागवल्‍या जातात. म्‍हणून उपयोगिता नैतिकदृष्‍ट्या तटस्‍थ आहे.
  4. उपयोगिता व उपयुक्‍तता यांत फरक: उपयोगिता म्‍हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरजा भागविण्याची क्षमता आहे, तर उपयुक्‍तता म्‍हणजे वस्‍तूचे उपयोगमूल्‍य होय. उदा., उपभोक्‍त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्‍तताही जाणवते. मात्र व्यसनी व्यक्‍तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते; परंतू उपयुक्‍तता जाणवत नाही.
  5. उपयोगिता व आनंद यांत फरक: वस्‍तूमध्ये उपयोगिता असली तरी त्‍यापासून उपभोक्‍त्‍याला आनंद मिळतोच असे नाही. उदा., आजारी व्यक्‍तीला इंजेक्‍शनमध्ये उपयोगिता जाणवते. कारण त्‍यामुळे आजार बरा होतो. पण त्‍यापासून त्‍याला आनंद मिळतोच असे नाही.
  6. उपयोगिता व समाधान यांतील फरक: उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. उपयोगिता व समाधान परस्‍परसंबंधित असूनही भिन्न संकल्‍पना आहेत. उदा., तहानलेली व्यक्‍ती एक ग्‍लास पाणी पिते. कारण पाण्यामध्ये तहान भागविण्याची क्षमता असते. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे आणि मिळालेले समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे.
  7. उपयोगितेचे केवळ तात्‍त्‍विक मापन शक्‍य: उपयोगिता ही मानसशास्‍त्रीय संकल्‍पना आहे. ती अदृश्य व अमूर्त संकल्‍पना आहे. त्‍यामुळे संख्यात्‍मक किंवा आकडेवारीत मापन करणे शक्‍य नाही. उदा., जेव्हा तहानलेली व्यक्‍ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी-अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. म्‍हणून उपयोगिता फक्‍त अनुभवता येते आणि उपयोगिता धनात्‍मक, शून्य व ॠणात्‍मक जाणवते. ॠणात्‍मक उपयोगितेला नकारात्‍मक उपयोगिता असेही म्‍हणतात.
  8. उपयोगिता बहुपर्यायी आहे: एका वस्‍तूमुळे एकापेक्षा जास्‍त व्यक्‍तींची गरज भागविली जाते. तसेच ती वस्‍तू विविध वापरासाठी उपयोगी ठरते. उदा., विजेचा वापर विविध व्यक्‍तींसाठी आणि एकाच वेळी विविध हेतू साध्य करण्यासाठी होतो.
  9. उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते: वस्‍तूची उपयोगिता ही व्यक्‍तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता जास्‍त तेवढी उपयोगिता अधिक जाणवते, तर गरजेची तीव्रता कमी झाल्‍यास उपयोगिता घटत जाते. उदा., भुकेलेल्‍या व्यक्‍तीला अन्नामध्ये भूक नसलेल्‍या व्यक्तीपेक्षा जास्‍त उपयोगिता जाणवते.
  10. उपयोगिता मागणीचा आधार: वस्‍तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्‍ती त्‍या वस्‍तूसाठी मागणी करेल. उदा. आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्‍हणून ती औषधाची मागणी करते.
shaalaa.com
उपयोगिता
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

मातीपासून खेळणी : ______ :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता


वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते, त्यामुळे निर्माण होणारी उपयोगिता.


विसंगत शब्द ओळखा.

उपयोगितेचे प्रकार:


विधान (अ): उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

तर्क विधान (ब): उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो.


फरक स्पष्ट करा.

काल उपयोगिता व स्थल उपयोगिता


खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 

मनिषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.


रक्तपेढी (Blood Bank) हे याचे उदाहरण आहे.

  1. स्थल उपयोगिता
  2. ज्ञान उपयोगिता
  3. सेवा उपयोगिता
  4. काल उपयोगिता

सहसंबंध पूर्ण करा:

रूप उपयोगिता : फर्निचर : : ______ : डॉक्टर


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×