English

माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा.

Explain

Solution

माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रक हे एक प्रकारे उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे. नवनव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावे यासाठीची ती एक खिडकी आहे. जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन असते. माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते. नवीन ग्राहक मिळवण्याची, नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी आहे. माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते. माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहोचवता येते. माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते. माहितीपत्रक वाचताक्षणीच लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले, की समजावे माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला आहे.

shaalaa.com
माहितीपत्रक
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा.


माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा:
आकर्षक मांडणी.


‘माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी’ थोडक्यात स्पष्ट करा.


थोडक्यात माहिती लिहा : 
माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे.


थोडक्यात माहिती लिहा : 
माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच.


माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत लिहा.


महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा.


एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा.


माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्टये’ लिहा:

माहितीपत्रक म्हणजे ______ माहितीला प्राधान्य ______ उपयुक्तता ______ लिखित माध्यम ______ भाषाशैली.


माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.


आठवडी बाजाराचे माहितीपत्रक तयार करा.

आठवडी बाजाराचे माहितीपत्रकाचा उद्देश ______ त्यात कोणत्या ______ माहितीला प्राधान्य ______ आठवडी बाजार माहितीपत्रकाची उपयुक्कता ______ सरळ भाषाशैली.


‘हुरडा पार्टी’साठी माहितीपत्रक तयार करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.


माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा.

सुसंगत व अचूक माहिती ______ उपयुक्तता व परिणामकारक दक्षता ______ माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण ______ आकर्षक मांडणी व भाषाशैली ______ मनाला भिडणारी शब्दयोजना.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×