Advertisements
Advertisements
Questions
थोडक्यात माहिती लिहा :
माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच.
‘माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्ष जाहिरात असते’ विधान स्पष्ट करा.
Solution
माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. वेगवेगळ्या संस्था/कंपन्या आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक काढत असतात. माहितीपत्रक यामुळे एकावेळी मोठ्या जनसमुदायापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवता येते. कमी खर्चात, कमी वेळेत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते. माहितीपत्रकाचे नीटनेटके स्वरूप ग्राहकाला आकर्षित करीत असते. माहितीपत्रकात 'माहिती'ला अधिक महत्त्व असते. त्यामुळे माहितीपत्रकाच्या हेतूशी सुसंगत माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. जनमत आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रक म्हणजे पहिली पायरी असते. व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद माहितीपत्रकाने साधला जातो. माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते, तर ग्राहकाला उत्पादनाचा विश्वासार्ह आढावा घेता येतो. माहितीपत्रक उत्पादनाविषयी औत्सुक्य निर्माण करून ग्राहकाला आपलेसे करीत असते. त्यामुळे माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरात असते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा.
माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा:
आकर्षक मांडणी.
‘माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी’ थोडक्यात स्पष्ट करा.
थोडक्यात माहिती लिहा :
माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे.
माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत लिहा.
महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा.
एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा.
माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्टये’ लिहा:
माहितीपत्रक म्हणजे ______ माहितीला प्राधान्य ______ उपयुक्तता ______ लिखित माध्यम ______ भाषाशैली.
माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.
आठवडी बाजाराचे माहितीपत्रक तयार करा.
आठवडी बाजाराचे माहितीपत्रकाचा उद्देश ______ त्यात कोणत्या ______ माहितीला प्राधान्य ______ आठवडी बाजार माहितीपत्रकाची उपयुक्कता ______ सरळ भाषाशैली.
‘हुरडा पार्टी’साठी माहितीपत्रक तयार करा.
माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.
माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा.
सुसंगत व अचूक माहिती ______ उपयुक्तता व परिणामकारक दक्षता ______ माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण ______ आकर्षक मांडणी व भाषाशैली ______ मनाला भिडणारी शब्दयोजना.