English

महर्षी कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रमा' ची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून 'हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था' असे त्यांनी तिचे नामांतर केले. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. उत्तर लिहा. (२)

गणिताचा गुणधर्म: ______
अनाथ बालिकाश्रमाचे नामांतरानंतरचे नाव: ______

              महर्षी कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रमा' ची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून 'हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था' असे त्यांनी तिचे नामांतर केले. 'पै पै चा निधी' व 'मुरुड निधी' त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती, की यांतील पै पै चा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे! कर्व्यांना जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव! कर्वे स्वत: मोटार वापरत नसत. मैलोनगणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वत:चे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात, हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे, आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वत:च्याच विश्वात वावरतात, अशी कुरबूर, घरच्यांच्या मनांत घर करून राहिली होती. वस्तुत: समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती; पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही! नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत. विचार करत. विचार पक्का झाला, की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई, की त्यांच्या चित्तात काय चालले आहे! हे डावपेच नव्हते; उलटपक्षी, बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे, हेच श्रेयस्कर असते!

2. का ते लिहा. (२)

महर्षी कर्वे यांच्या कार्याविषयी प्रश्न उपस्थित करायला समाज धजावला नाही .....

3. स्वमत (३)

'बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते' याविषयी तुमचे मत उताऱ्याच्या आधारे लिहा.

Comprehension

Solution

1.

गणिताचा गुणधर्म: नेमकेपणा

अनाथ बालिकाश्रमाचे नामांतरानंतरचे नाव: हिंगणे स्त्रीशिक्षण संख्या

2. कारण समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वत:चे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात हे समाजाला माहीत होते.

3. थोर समाजसुधारक महर्षी कर्वे यांच्या रूपाने आपल्या देशाला एक महान व्यक्तिमत्त्व लाभले. 'बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाऊले'. हे वचन महर्षी कर्वे यांना लागू पडते. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तपेढ रोवली. समाजकार्यासाठी जमा केलेल्या पैशांचा चोख हिशोब त्यांच्याकडे असे. स्वत:च्या कमाईतील आपल्या कुटुंबाला आवश्यक तेवढी रक्कम ठेवून उरलेली रक्कम ते समाजकार्यासाठी वापरत असत. दूरच्या अंतरावरील आश्रमात जातानाही मोटारीचा वापर न करता ते पायीच जात असत. बोलत बसण्यापेक्षा ते विचार करत आणि हे विचार आचरणात आणत. त्यांच्या मनातील गोष्टी जेव्हा ते प्रत्यक्ष कृतीत आणत तेव्हा समाजाला त्यांच्या विचारांची खोली लक्षात येई. इतरांप्रमाणे कार्य पूर्ण करण्याआधीच त्याची प्रसिद्धी करणे त्यांना कधी रुचले नाही. बोलत बसण्यापेक्षा काम करून दाखवण्यावर त्यांचा विश्वास होता. भारतीय समाजाचे 'अर्धांग' असलेल्या स्त्रियांना शिक्षणाचा आणि उन्नतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. अशारीतीने, या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे वेगळेपण प्रकर्षाने दिसून येते.

shaalaa.com
कर्ते सुधारक कर्वे
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: कर्ते सुधारक कर्वे - कृती क्रमांक ४

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 13 कर्ते सुधारक कर्वे
कृती क्रमांक ४ | Q 1. (अ)

RELATED QUESTIONS

खालील आकृती पूर्ण करा.


खालील आकृती पूर्ण करा.


खालील आकृती पूर्ण करा.


महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा. 

कार्यात नेमकेपणा होता.
विचार पक्का झाला की

हे केव्हा घडेल ते लिहा.

कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल ______


हे केव्हा घडेल ते लिहा.

स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल ______


चौकट पूर्ण करा.

लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा - ______ 


चौकट पूर्ण करा.

कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी - ______


पाठाच्या (कर्ते सुधारक कर्वे) आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.

समाजाविरूद्ध विद्रोह केला तर - ______ 


पाठाच्या (कर्ते सुधारक कर्वे) आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.

लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी - ______ 


‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.


‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा.


‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत सांगा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृतिबंध पूर्ण करा. (२)

          भारताचे अर्धांग जे स्त्रिया; त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत 'माता' म्हणतो; सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो, हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी, जपानच्या धर्तीवर इ.स. १९१६ साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात, महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्रीशिक्षणाचे माहात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्रीशिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांत त्यांना दोन कार्ये करावयाची होती. एका टोकावर, स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर, तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणार्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती.

2. उत्तर लिहा. (२)

भारतातील समाजाला चीड आणणारा विरोधाभास

  1. _____________
  2. _____________

3. स्वमत (३)

'स्त्रिया अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल' या विधानातील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×