Advertisements
Advertisements
Question
‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.
Solution
समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते. थोडी कमी-जास्त भरेल. पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले. त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्याचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे, हे कळतही नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता, पण ती वाया जाते. पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्री असतो. स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.
खालील आकृती पूर्ण करा.
महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा.
कार्यात नेमकेपणा होता. |
↓ |
↓ |
↓ |
विचार पक्का झाला की |
↓ |
↓ |
चौकट पूर्ण करा.
लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा - ______
चौकट पूर्ण करा.
कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी - ______
पाठाच्या (कर्ते सुधारक कर्वे) आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.
समाजाविरूद्ध विद्रोह केला तर - ______
पाठाच्या (कर्ते सुधारक कर्वे) आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.
लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी - ______
‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा.
‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत सांगा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. कृती करा. (२)
१.
महर्षी कर्वे यांची उताऱ्यात आलेली गुणवैशिष्ट्ये | _____________________ |
_____________________ |
पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यांतून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवाविवाह होऊ शकतो, हे दाखवून दिले. स्वत: विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्रा. धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ 'सत्पुरुषांचा छळ करावा', एवढेच 'ऐतिहासिक कार्य' तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट, जिथे फाटला तिथे, शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससेहोलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे, संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला |
2. (१) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (१)
1. अज्ञ समाजाचे ऐतिहासिक कार्य ____________
अ) सत्पुरुषांचा विरोध करणे.
ब) सत्पुरुषांचा सन्मान करणे.
क) सत्पुरुषांचा छळ करणे.
ड) सत्पुरुषांकडे पाठ फिरवणे.
(२) 'गणित' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (१)
3. स्वमत. (३)
'कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृतिबंध पूर्ण करा. (२)
भारताचे अर्धांग जे स्त्रिया; त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत 'माता' म्हणतो; सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो, हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी, जपानच्या धर्तीवर इ.स. १९१६ साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात, महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्रीशिक्षणाचे माहात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्रीशिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांत त्यांना दोन कार्ये करावयाची होती. एका टोकावर, स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर, तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणार्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. |
2. उत्तर लिहा. (२)
भारतातील समाजाला चीड आणणारा विरोधाभास
- _____________
- _____________
3. स्वमत (३)
'स्त्रिया अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल' या विधानातील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. उत्तर लिहा. (२)
गणिताचा गुणधर्म: ______
अनाथ बालिकाश्रमाचे नामांतरानंतरचे नाव: ______
महर्षी कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रमा' ची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून 'हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था' असे त्यांनी तिचे नामांतर केले. 'पै पै चा निधी' व 'मुरुड निधी' त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती, की यांतील पै पै चा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे! कर्व्यांना जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव! कर्वे स्वत: मोटार वापरत नसत. मैलोनगणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वत:चे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात, हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे, आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वत:च्याच विश्वात वावरतात, अशी कुरबूर, घरच्यांच्या मनांत घर करून राहिली होती. वस्तुत: समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती; पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही! नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत. विचार करत. विचार पक्का झाला, की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई, की त्यांच्या चित्तात काय चालले आहे! हे डावपेच नव्हते; उलटपक्षी, बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे, हेच श्रेयस्कर असते! |
2. का ते लिहा. (२)
महर्षी कर्वे यांच्या कार्याविषयी प्रश्न उपस्थित करायला समाज धजावला नाही .....
3. स्वमत (३)
'बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते' याविषयी तुमचे मत उताऱ्याच्या आधारे लिहा.