Advertisements
Advertisements
Question
मी 75 ही संख्या मनात धरली, त्या संख्येच्या दोन्ही अंकांतील संबंध दर्शवणारी अट लिहा. मूळ संख्या आणि अंकांची अदलाबदल करून येणाऱ्या संख्येतील संबंध दर्शवणारी अट लिहा.
Solution
संख्येच्या दोन्ही अंकांतील संबंध दर्शवणारी अट -
दशक स्थानावर असलेली संख्या ही एकक स्थानावर असलेल्या संख्येपेक्षा 2 ने मोठी आहे.
मूळ संख्या आणि अंकांची अदलाबदल करून येणार्या संख्येतील संबंध दर्शवणारी अट -
मूळ संख्या आणि अंकांची अदलाबदल करून येणाऱ्या संख्येची बेरीज 132 होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा.
विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने, तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी/तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासांत पूर्ण केला असेल, तर विशालने बसने किती किमी प्रवास केला?
मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.
एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5 : 3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे, तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा.
एक कोन आणि त्याचा कोटिकोन यांच्या मापांतील फरक 10° असल्यास मोठ्या कोनाचे माप किती?
समीकरण 3x - 2y = 17 मध्ये (i) y = -1 असताना x ची किंमत शोधा. (ii) x = 3 असताना y ची किंमत काढा.
एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठरावीक वेगाने कापते. जर गाडीचा वेग 6 कि.मी/तास वाढला असता, तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते. जर गाडीचा वेग 6 किमी/तास कमी झाला असता, तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 6 तास जास्त लागतील, तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला?
सोडवा. 0.4x + 0.3y = 1.7; 0.7x – 0.2y = 0.8.
मी स्टेशनवरून घरी जाण्यासाठी एक रिक्षा ठरवली. पहिल्या किलोमीटरसाठी रुपये x आणि पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी रुपये y रुपये ठरले. दहा किलोमीटर गेल्यावर 40 रुपये झाले व 16 किलोमीटर गेल्यावर 58 रुपये झाले, तर पहिल्या किलोमीटरला किती भाडे होते?