Advertisements
Advertisements
Question
मी स्टेशनवरून घरी जाण्यासाठी एक रिक्षा ठरवली. पहिल्या किलोमीटरसाठी रुपये x आणि पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी रुपये y रुपये ठरले. दहा किलोमीटर गेल्यावर 40 रुपये झाले व 16 किलोमीटर गेल्यावर 58 रुपये झाले, तर पहिल्या किलोमीटरला किती भाडे होते?
Solution
मी पहिल्या किलोमीटरसाठी रुपये X आणि पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी रुपये Y दिले.
दहा किलोमीटरचे रुपये X + 9Y झाले.
16 किलोमीटरचे रुपये X + 15Y झाले.
दहा किलोमीटर गेल्यावर भाडे 40 रुपये झाले.
∴ X + 9Y = 40 …(i)
16 किलोमीटर गेल्यावर भाडे 58 रुपये झाले.
X + 15Y = 58 …(ii)
समीकरण (ii) मधून (i) वजा करून,
X + 15Y = 58
X + 9Y = 40
- - -
6Y = 18
∴ Y = `18/6 = 3`
Y = 3 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
X + 9(3) = 40
∴ X + 27 = 40
∴ X = 40 – 27 = 13
∴ पहिल्या किलोमीटरला 13 रुपये भाडे होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दोन संख्यांमधील फरक ३ असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज १९ आहे, तर त्या संख्या शोधा.
कृती पूर्ण करा.
वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा.
समीकरणे सोडवून उत्तर लिहा.
100 रुपयांच्या नोटांची संख्या `square` 50 रुपयांच्या नोटांची संख्या `square`
मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.
एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5 : 3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे, तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा.
एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 52 सेमी असल्यास आयताची लांबी किती?
समीकरण 3x - 2y = 17 मध्ये (i) y = -1 असताना x ची किंमत शोधा. (ii) x = 3 असताना y ची किंमत काढा.
एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठरावीक वेगाने कापते. जर गाडीचा वेग 6 कि.मी/तास वाढला असता, तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते. जर गाडीचा वेग 6 किमी/तास कमी झाला असता, तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 6 तास जास्त लागतील, तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला?
एका आयताकृती बागेची अर्धपरिमिती 36 सेमी आहे. बागेची लांबी रुंदीपेक्षा 4 सेमी ने जास्त आहे, तर बागेचे एकूण क्षेत्रफळ किती?