Advertisements
Advertisements
Question
समीकरणे सोडवून उत्तर लिहा.
100 रुपयांच्या नोटांची संख्या `square` 50 रुपयांच्या नोटांची संख्या `square`
Solution
अनुष्काजवळ ₹ 100 च्या x नोटा व ₹ 50 च्या y नोटा आहेत.
दिलेल्या पहिल्या अटीनुसार, तिला आनंदने ₹ 2500 दिले.
∴ 100x + 50y = 2500
∴ 2x + y = 50 ....(i) [दोन्ही बाजूंना 50 ने भागून]
दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, जर नोटांच्या संख्येची अदलाबदल झाली तर तिला 500 रुपये कमी मिळतात.
∴ 100y + 50x = 2000
∴ 2y + x = 40 .....[दोन्ही बाजूंना 50 ने भागून]
म्हणजेच, x + 2y = 40
∴ 2x + 4y = 80 ...(ii) [दोन्ही बाजूंना 2 ने गुणून]
समीकरण (ii) मधून समीकरण (i) वजा करून,
2x + 4y = 80
2x + y = 50
- - -
3y = 30
∴ y = `30/3` = 10
y = 10 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
2x + y = 50
2x + 10 = 50
∴ 2x = 50 - 10
∴ 2x = 40
∴ x = `40/2` = 20
∴ अनुष्काजवळ 100 रुपयांच्या 20 व 50 रुपयांच्या 10 नोटा आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दोन संख्यांमधील फरक ३ असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज १९ आहे, तर त्या संख्या शोधा.
10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर A प्रकारच्या 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या, तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या, तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास B प्रकारच्या 40 पेट्या लागतात, तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती?
कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षाभाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले, की या वस्तू ऑनलाइन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्राम चहा व ७ किलोग्राम साखर ऑनलाइन मागवली, तेव्हा त्यांचा 880 रुपये खर्च झाला, तर चहा आणि साखर यांचा प्रतिकिलोग्राम दर काढा.
एक कोन आणि त्याचा कोटिकोन यांच्या मापांतील फरक 10° असल्यास मोठ्या कोनाचे माप किती?
एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 52 सेमी असल्यास आयताची लांबी किती?
एका अंकगणिती श्रेढीसाठी t17 = 54 आणि t9 = 30 असल्यास प्रथम पद (a) आणि सामान्य फरक (d) काढा.
एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठरावीक वेगाने कापते. जर गाडीचा वेग 6 कि.मी/तास वाढला असता, तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते. जर गाडीचा वेग 6 किमी/तास कमी झाला असता, तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 6 तास जास्त लागतील, तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला?
एका आयताकृती बागेची अर्धपरिमिती 36 सेमी आहे. बागेची लांबी रुंदीपेक्षा 4 सेमी ने जास्त आहे, तर बागेचे एकूण क्षेत्रफळ किती?
मी 75 ही संख्या मनात धरली, त्या संख्येच्या दोन्ही अंकांतील संबंध दर्शवणारी अट लिहा. मूळ संख्या आणि अंकांची अदलाबदल करून येणाऱ्या संख्येतील संबंध दर्शवणारी अट लिहा.
मी स्टेशनवरून घरी जाण्यासाठी एक रिक्षा ठरवली. पहिल्या किलोमीटरसाठी रुपये x आणि पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी रुपये y रुपये ठरले. दहा किलोमीटर गेल्यावर 40 रुपये झाले व 16 किलोमीटर गेल्यावर 58 रुपये झाले, तर पहिल्या किलोमीटरला किती भाडे होते?