Advertisements
Advertisements
Question
दोन संख्यांमधील फरक ३ असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज १९ आहे, तर त्या संख्या शोधा.
Solution
समजा, मोठी संख्या x व लहान संख्या y आहे.
दिलेल्या पहिल्या अटीनुसार, दोन संख्यांमधील फरक 3 आहे.
∴ x - y = 3 ....(i)
दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे.
∴ 3x + 2y = 19 ....(ii)
समीकरण (i) ला 2 ने गुणून,
2x - 2y = 6 .....(iii)
समीकरण (ii) व (iii) ची बेरीज करून,
3x + 2y = 19
+ 2x - 2y = 6
5x = 25
∴ x = `25/5`
∴ x = 5
∴ x = 5 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
x - y = 3
5 - y = 3
∴ 5 - 3 = y
∴ y = 2
∴ मोठी संख्या 5 व लहान संख्या 2 आहे.
RELATED QUESTIONS
वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा.
मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.
एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 52 सेमी असल्यास आयताची लांबी किती?
एक व्यक्ती एका निश्चित पगार आणि दरवर्षी ठरावीक वेतनवाढ या अटींवर नोकरी सुरू करते. 4 वर्षांनी त्या व्यक्तीचा पगार रुपये 15000 आणि 10 वर्षांनी पगार रुपये 18000 असल्यास त्या व्यक्तीचा मूळ पगार आणि वेतनवाढ काढा.
समीकरण 3x - 2y = 17 मध्ये (i) y = -1 असताना x ची किंमत शोधा. (ii) x = 3 असताना y ची किंमत काढा.
एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठरावीक वेगाने कापते. जर गाडीचा वेग 6 कि.मी/तास वाढला असता, तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते. जर गाडीचा वेग 6 किमी/तास कमी झाला असता, तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 6 तास जास्त लागतील, तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला?
सोडवा. 0.4x + 0.3y = 1.7; 0.7x – 0.2y = 0.8.
मी 75 ही संख्या मनात धरली, त्या संख्येच्या दोन्ही अंकांतील संबंध दर्शवणारी अट लिहा. मूळ संख्या आणि अंकांची अदलाबदल करून येणाऱ्या संख्येतील संबंध दर्शवणारी अट लिहा.
एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेमी आहे. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेमीने कमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.