Advertisements
Advertisements
Question
‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
Solution
जर मी झाड झाले तर मी जंगलात, रस्त्याच्या कडेला वा डोंगरमाळावर वाढेन. मी जमिनीतून भरपूर पाणी व माझा खाऊ, म्हणजेच क्षार शोषून घेईन. माझ्या अंगावर फुले, फळे असतील. माझे हात म्हणजेच फांद्या उंचावून मी पाखरांना माझ्या अंगाखांद्यावर बागडायला बोलवेन. पाखरांची घरटी माझ्या फांद्यांवर असतील. ते बिनधास्तपणे माझ्या फांद्यांवर आराम करू शकतील, विसावा घेऊ शकतील. मी सगळ्यांना फुले, फळे देऊन खूश करेन. उन्हातानातून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना, माझ्या पारावर बसलेल्या लोकांना मी माझी घनदाट, गारेगार सावली देईन. माझ्या हिरव्यागार रूपाकडे पाहून सर्वांना प्रसन्न वाटेल.
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
विजा केव्हा चमकल्या?
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिक्षा खडखड करत थांबली.
____________________
____________________
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
अवकाशी विहरणारा -
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
काळोखाला चिरणारा -
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हांला ‘पृथ्वीचे’ वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.