Advertisements
Advertisements
Question
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात?
Solution 1
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पांतून पुढील गोष्टी साध्य होतात-
- प्रकल्पांतर्गत वारसास्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते.
- स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो.
- सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत; यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते.
- स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील, अशा उद्योग-व्यवसायांना चालना मिळावी, यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते.
Solution 2
प्रस्तावना: नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे व्यवस्थापन म्हणजेच जतन व संवर्धन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. यातून पुढील गोष्टी साध्य होतात.
१. संबंधित प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या वारसास्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन व संवर्धनाची कामे करणे शक्य होते.
२. त्या विशिष्ट ठिकाणच्या स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमानकाळातील विविध आव्हाने, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो.
३. सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन व संवर्धन करत असताना तेथील स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, याकरता उपाययोजनांचे नियोजन करता येते.
४. प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांनाही सामील करून त्यांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देता येईल अशा उद्योग-व्यवसायांना चालना मिळण्यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते.
निष्कर्ष: अशाप्रकारे, ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या प्रकल्पाद्वारे स्थानिक लोकांचा जाणिवपूर्वक विचार केला जातो.
RELATED QUESTIONS
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पश्चिम घाट रांगांमधील कास पठार हे ______ जिल्ह्यातील आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
टिपा लिहा.
अभिलेखागार
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील कालरेषा पूर्ण करा:
भारतातील नैसर्गिक जागतिक वारसास्थळे