Advertisements
Advertisements
Question
निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.
Solution 1
निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो-
- मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे.
- निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे.
- उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे.
- निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे.
- राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे.
- निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे.
Solution 2
भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी भारताचा निवडणूक आयोग आहे. निवडणूक प्रक्रिया खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह व्हावी यासाठी भारतीय संविधानाच्या कलम ३२४ नुसार या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत:
१. मतदारयाद्या तयार करणे
मतदारांच्या याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे, मतदारयादीत नव्या मतदारांचा समावेश करणे, मतदारांना ओळखपत्र देणे.
२. वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे
निवडणुकांचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यासाठी कोणत्या राज्यात, केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घेता येतील याचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम निश्चित करणे.
३. उमेदवारांच्या अर्जांची छाननी
निवडणुकांच्या तारखा जाहिर झाल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिलेल्या विविध राजकीय पक्षांचे उमेदवार व कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार यांच्या उमेदवारी अर्जांची काटेकोर छाननी करणे, पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्याची परवानगी देणे.
४. राजकीय पक्षांना मान्यता देणे
भारतात बहुपक्षपद्धती आहे. सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. त्यामुळे, विविध राजकीय पक्षांना निवडणूक लढवण्याची मान्यता देणे किंवा त्यांची मान्यता रद्द करणे व राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देणे.
५. निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे
निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवणे, त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणे, उमेदवाराची अपात्रता घोषित करणे.