Advertisements
Advertisements
Question
O केंद्र व 3 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रातून जाणाऱ्या छेदिकेवर वर्तुळकेंद्राच्या विरुद्ध बाजूस वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावर बिंदू P व बिंदू P घ्या. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
Solution
कच्ची आकृती
रचनेच्या पायऱ्या:
- O केंद्र 3 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.
- बिंदू P व बिंदू Q अशाप्रकारे घ्या, की OP = 7 सेमी व OQ = 7 सेमी.
- रेख OP चा लंबदुभाजक काढा. तो रेख OP ला बिंदू M मध्ये छेदतो. त्याचप्रमाणे, रेख OQ चा लंबदुभाजक काढा. तो रेख OQ ला बिंदू N मध्ये छेदतो.
- बिंदू M हे केंद्र मानून आणि त्रिज्या PM घेऊन वर्तुळाला R बिंदूत छेदणारा कंस काढा. बिंदू N हे केंद्र मानून आणि त्रिज्या NQ घेऊन वर्तुळाला S बिंदूत छेदणारा कंस काढा.
- किरण PR आणि QS काढा. किरण PR आणि QS या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.
2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर बिंदू A व B घेऊन व्यास AB काढा. |
↓ |
किरण OA काढा. किरण OB काढा. |
↓ |
किरण OA ला बिंदू A मधून लंब रेषा काढा. |
↓ |
किरण OB ला बिंदू B मधून लंब रेषा |
C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.
C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. |
↓ |
आरंभबिंदू C असणाऱ्या किरणावर 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. |
↓ |
रेख BC चा लंबदुभाजक काढून मध्यबिंदू P मिळवा. |
↓ |
P केंद्र व त्रिज्या CP घेऊन वर्तुळ काढा. दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूस A व D नाव द्या. |
↓ |
रेषा BA व रेषा BD काढा. |
↓ |
स्पर्शिकाखंड BA = ______ सेमी स्पर्शिकाखंड BD = ______ सेमी |
4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या स्पर्शिकांमधील कोन 60° असेल.
2.5 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात 5 सेमी लांबीची जीवा AB काढा. वर्तुळावर बिंदू C असा घ्या, की BC = 3 सेमी. ΔABC काढा. A, B व C बिंदूंतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळाला दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या एकमेकींना लंब असतील.