Advertisements
Advertisements
Question
परिच्छेद पूर्ण करा.
शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पहाण्यात मग्न होती. एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेल्याबाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले. पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले. ही कृती ______ पेशींद्वारे नियंत्रित झाली. या पेशीतील ______ च्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली. तेथून ही माहिती ______ कडे व तेथून ______ च्या टोकाकडे पाठवली गेली. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजेच ______ मधून जातात. अशा प्रकारे ______ चे शरीरात वहन होते आणि आवेग ______ कडून ______ कडे पोहोचवले जाऊन ______ क्रिया पूर्ण होते.
(चेतापेशी, स्नायूपेशी, आवेग, वृक्षिका, अक्षतंतू, संपर्कस्थान, प्रतिक्षिप्त, पेशीकाया)
Solution
शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पहाण्यात मग्न होती. एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेल्याबाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले. पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले. ही कृती चेतापेशींद्वारे नियंत्रित झाली. या पेशीतील वृक्षिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली. तेथून ही माहिती पेशीकायाकडे व तेथून अक्षतंतूच्या टोकाकडे पाठवली गेली. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजेच संपर्कस्थानामधून जातात. अशा प्रकारे आवेगांचे शरीरात वहन होते आणि आवेग चेतापेशीकडून स्नायूपेशीकडे पोहोचवले जाऊन प्रतिक्षिप्त क्रिया पूर्ण होते.