Advertisements
Advertisements
Question
योग्य जोड्या जुळवून त्याबाबत स्पष्टीकरण लिहा.
'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ |
1. बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ | a. गुरुत्वानुवर्ती हालचाल |
2. प्ररोह संस्थेची होणारी वाढ | b. रसायन-अनुवर्ती हालचाल |
3. मूळ संस्थेची होणारी वाढ | c. प्रकाशानुवर्ती हालचाल |
4. पाण्याच्या दिशेने होणारी वाढ | d. वृद्धी असंलग्न हालचाल |
e. जलानुवर्ती हालचाल |
Match the Columns
Solution
'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ | स्पष्टीकरण |
1. बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ | b. रसायन-अनुवर्ती हालचाल | रसायन-अनुवर्तन म्हणजे विशिष्ट रसायनांना वनस्पतीच्या ठरावीक भागांनी दिलेला प्रतिसाद. वनस्पतीच्या भागांची या प्रतिसादामुळे हालचाल होते. |
2. प्ररोह संस्थेची होणारी वाढ | c. प्रकाशानुवर्ती हालचाल | वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाशाच्या दिशेने वाढ दर्शवते. यामुळे प्ररोह संस्था ही नेहमीच प्रकाशानुवरती हालचाल दर्शवते. |
3. मूळ संस्थेची होणारी वाढ | a. गुरुत्वानुवर्ती हालचाल | वनस्पतीची मुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल दर्शवतात. म्हणून मूळ संस्थेची वाढ ही गुरुत्वानुवर्ती हालचाल आहे. |
4. पाण्याच्या दिशेने होणारी वाढ | e. जलानुवर्ती हालचाल | जलानुवर्ती हालचाल दर्शवणारे वनस्पतीचे भाग म्हणजे पाण्याच्या दिशेने होणारी वाढ दाखवतात. वनस्पतींची मुळे जलानुवर्ती हालचाल दर्शवतात. |
shaalaa.com
समन्वय
Is there an error in this question or solution?